शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

स्ट्रक्चरल आॅडिट कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 23:57 IST

शहरातील रेल्वेस्टेशनवरील पादचारी पुलांचे (दादरा) स्ट्रक्चरल आॅडिट कागदावरच आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील रेल्वेस्टेशनवरील पादचारी पुलांचे (दादरा) स्ट्रक्चरल आॅडिट कागदावरच आहे. रेल्वेस्टेशनवरील दोन पुलांवर प्रवाशांची भिस्त आहे; परंतु अरुंद जागेमुळे दररोज हजारो प्रवाशांना गर्दीतून ये-जा करावी लागत आहे, तर रेल्वेस्टेशन परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या पुलाची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. त्याकडे कोणाचे लक्ष जात नसल्याने कधीही दुर्घटना घडू शकते.औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरून दररोज धावणाºया, आठवड्यातून एकदा, दोनदा आणि तीनदा धावणाºया अशा ६१ रेल्वेंची येथून ये-जा होते. रेल्वेस्टेशनच्या नव्या आणि जुन्या इमारतीसमोर पादचारी पूल आहे. प्लॅटफॉर्म दोन आणि तीनवर येणाºया रेल्वेतील प्रवाशांना ये-जा करण्यासाठी हे दोन्ही पूल महत्त्वाचे ठरतात. पादचारी पुलांना जोडूनच सरकता जिना आणि लिफ्टची सुविधा आहे; परंतु अनेकदा ते बंद असतात. त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक दोन व तीनवर रेल्वे आल्यानंतर प्रवाशांच्या गर्दीने पादचारी पूल खचाखच भरून जातो. शिवाय गर्दीच्या नियंत्रणासाठी क ोणीही नसते. याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. तसेच रेल्वेस्टेशन परिसरातील हमालवाडा भागात राहणाºया नागरिकांच्या सुविधेसाठी मालधक्का ते रेल्वेस्टेशन पार्किंग असा पादचारी पूल बांधण्यात आला आहे. ये-जा करण्यासाठी रेल्वेस्टेशनवरील रुळांऐवजी हा पूल महत्त्वपूर्ण ठरतो; परंतु आजघडीला या पुलाची अवस्था वाईट आहे. जागोजागी फरशा उखडल्या आहेत, तसेच काही ठिकाणी पुलाचा स्लॅब धोकादायक अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांकडून त्याचा वापर टाळला जात आहे. त्यामुळे पुलाची वेळीच देखभाल-दुरुस्तीची गरज आहे. रेल्वेस्टेशनवरील दोन्ही पूल चांगल्या अवस्थेत आहेत. रेल्वेस्टेशन परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी असलेल्या पुलाची माहिती घेतली जाईल, असे रेल्वे अधिकाºयांनी सांगितले.