शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मटक्याचा गोरखधंदा परभणीत जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:40 IST

जगण्याची भ्रांत हरविणारा आणि सर्वसामान्यांना देशोधडीला लावणारा मटका, जुगार परभणी शहरात राजरोसपणे सुरू असल्याची बाब ‘लोकमत’ने मंगळवार व गुरुवार असे दोन दिवस केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जगण्याची भ्रांत हरविणारा आणि सर्वसामान्यांना देशोधडीला लावणारा मटका, जुगार परभणी शहरात राजरोसपणे सुरू असल्याची बाब ‘लोकमत’ने मंगळवार व गुरुवार असे दोन दिवस केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आली़जिल्ह्यात मटका, जुगार, दारू विक्री असे अनेक अवैध धंदे सुरू आहेत़ दिवसागणिक या वाम मार्गाच्या व्यवसायाची उलाढाल वाढत चालली आहे़ काही दिवसांपूर्वी शहरातील मोजक्याच ठिकाणी सुरू असलेला हा धंदा आता रस्त्या रस्त्यांवर आडोसा पाहून चालविला जात आहे़ त्यामुळे या धंद्याला पोलिसांचा वरदहस्त आहे की काय? अशी शंका घेण्याइतपत परिस्थिती निर्माण झाली आहे़ अवैध धंदे बंद करण्याच्या मागण्या मागील काही दिवसांपासून जोर धरत आहेत़ त्यामुळे शहरात हे अवैध धंदे सुरू आहेत का? याची पाहणी करण्यासाठी ‘लोकमत’ने मंगळवारी व गुरुवारी असे दोन दिवस स्टिंग आॅपरेशन केले, तेव्हा हा व्यवसाय सर्रास सुरू असल्याची बाब स्पष्ट झाली़ मंगळवारी दुपारी १२़४० च्या सुमारास वांगी रोड भागात फेरफटका मारला तेव्हा एका पानटपरीवर मटका घेतला जात असल्याचे पहावयास मिळाले़ त्यानंतर १२़ ४५ च्या सुमारास हडको कॉर्नर येथे पाहणी केली असता, टपरी वजा दुकानामध्ये काही जण मटका घेताना दिसून आले़ त्यानंतर १२़५५ वाजता अंबिकानगर भागामध्ये एका कॉर्नरवर टपरीत मटका बुकी असल्याचे दिसून आले़शहरातील जुना मोंढा परिसरात दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास दोन ते तीन ठिकाणी मटका घेतला असल्याचे पहावयास मिळाले. त्यातील एका ठिकाणी तर आॅनलाईन लॉटरी सेंटरच्या दुकानात बसून खुलेआम मटक्याच्या चिठ्ठ्या घेतल्या जात होत्या़ या तिन्ही दुकानातून सदर प्रतिनिधीने मटक्याच्या चिठ्ठ्या मिळविल्या. काद्राबाद प्लॉट परिसरातील कब्रस्तानजवळ एक इसम पानटपरीवर मटका घेताना आढळून आला. वीज वितरण कार्यालयाच्या समोर पानटपरीवर चलता-फिरता मटका सुरू होता़ नवा मोंढा परिसरात कमानीच्या समोर एका ठिकाणी मटका घेताना आढळून आले. एका दिवसाच्या पाहणीनंतर हा धंदा सातत्याने सुरू राहतो की नाही? याची पडताळणी करण्यासाठी पुन्हा गुरूवारीही ‘स्टिंग आॅपरेशन’ करण्यात आले. त्यामध्ये मंगळवारच्या स्थितीत तसुभरही बदल झाला नसल्याचे पहावयास मिळाले़ गुरुवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास शहरातील स्टेडियम मार्केटपासून मटका बुकींचा शोध सुरू केला़ तेव्हा स्टेडियम परिसरातच दोन ठिकाणी मटका बुकी दिसून आल्या़ त्यापुढे कच्छी बाजार, अपना कॉर्नर ते शनि मंदिर रस्ता या भागात फेरफटका मारला तेव्हा काही ठिकाणी बंद दाराआड तर काही ठिकाणी पडदा टाकून मटका सुरू असल्याचे दिसून आले़ मटका चालवित असताना पोलिसांची कोणतीही भीती अथवा कारवाईची धास्ती नसल्याची बाबही यावेळी पहावयास मिळाली़ या पाहणीत प्रत्येक मटका बुकीवर ७ ते ८ जण मटका लावत खेळत असल्याचे दिसून आले़ विशेष म्हणजे दिवसभर या मटका बुकींवर गर्दी असते़ काही दिवसांपूर्वी चोरून लपून खेळला जाणारा हा मटका आता मात्र खुलेआम सुरू आहे़ धार रोड परिसर, गुलशना बाग कॉर्नर या भागातही मटका बुकी सुरू असल्याचे पहावयास मिळाले़ सकाळपासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या मटका बुकी चालतात़ ओपन, क्लोज अशा दोन्ही वेळेला या भागात नागरिकांची गर्दी पहावयास मिळते़ शहरात खुलेआम मटका सुरू असल्याने मटका खेळणाºयांची संख्याही वाढत चालली आहे़