शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

सरसंघचालकांची वर्गमित्रांसोबत रंगली गप्पांची मैफल

By admin | Updated: January 16, 2016 23:16 IST

हिंगोली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघाचालक मोहन भागवत यांच्या साध्या राहणीमानाबरोबरच जुन्या मित्रांना आवर्जून भेटण्याच्या छंदाचा प्रत्यय हिंगोलीकरांना शनिवारी आला.

हिंगोली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघाचालक मोहन भागवत यांच्या साध्या राहणीमानाबरोबरच जुन्या मित्रांना आवर्जून भेटण्याच्या छंदाचा प्रत्यय हिंगोलीकरांना शनिवारी आला. शहरात आगमन झाल्यानंतर भागवत यांनी आपल्या वर्गमित्राचे घर गाठून मनमोकळ्या गप्पा मारल्या.२०१३ मध्ये मोहन भागवत यांनी हिंगोली भेटीत जुन्या वर्गमित्रांना आमंत्रित करून स्रेहमिलनाचा कार्यक्रम घेतला होता. शनिवारी सायंकाळी आयोजित कयाधूसंगम मेळाव्यासाठी त्यांचे आगमन दुपारी १२.३० वाजताच अमरावती-नांदेड इंटरसिटी एक्स्प्रेसने शहरात झाले. बियाणीनगरात विभागीय सहसंघचालक शीलचंद्र देशमुख यांच्या निवासस्थानी भोजन व विश्रांती झाल्यानंतर मोहन भागवत दुपारी ३.३० वाजता शास्त्रीनगरात डॉ.पुंजाजी गाडे यांच्या घरी पोहोचले. देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींमध्ये भागवत यांचा समावेश असल्याने झेड प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था तैनात होती. त्यामुळे पोलिस ताफ्यासह त्यांची गाडी पोहोचण्यापूर्वीच शास्त्रीनगराकडे जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी बंद केले होते. सामान्य व्यक्तींना प्रवेश बंद करण्याबरोबरच शेजारी-पाजारी राहणाऱ्यांना दरवाजे बंद ठेवण्याच्या सूचना होत्या. इतकेच नाहीतर आजूबाजूच्या इमारतींवरही शस्त्रधारी पोलिस टेहळणीस होते. पुंजाजी गाडे यांच्या घरी पोहोचल्यानंतर भागवत यांचे सुवासिनींनी औक्षण केले. यावेळी डॉ.पुंजाजी गाडे, प्रा.डॉ.वसंत गाडे व गाडे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. त्यानंतर भागवत यांनी बंद खोलीत वर्गमित्रांशी दिलखुलासपणे गप्पा मारल्या. हिंगोलीत राहणारे व बाहेरगावाहून आलेले सर्व वर्गमित्र मोहन भागवत यांना भेटण्यासाठी एकत्र आले होते. यात डॉ. पुंजाजी गाडे, डॉ. कल्याण काळे, डॉ. अनिल वैद्य, डॉ.कापरे, डॉ.बरवारे, डॉ.भाके, डॉ.झाडे, डॉ.पोपशेटवार,डॉ.मंडलेकर, डॉ.मोतेवार, डॉ.सी.एस. देशपांडे, डॉ.फुलारी, डॉ.पांडे, डॉ.संतान, डॉ.बोरलेटवार, डॉ.सरदेशपांडे, डॉ.केशव लुटे, डॉ.आठवले, डॉ. भालके यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)