शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अटीतटीच्या लढतीत प्रस्थापितांना धक्के

By admin | Updated: November 4, 2015 00:23 IST

जालना : जिल्ह्यातील ४५६ ग्रामपंचायतींचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. या निवडणुकांत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक प्रस्थापितांना

जालना : जिल्ह्यातील ४५६ ग्रामपंचायतींचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. या निवडणुकांत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक प्रस्थापितांना धक्के बसल्याचे चित्र या निकालावरून स्पष्ट होत आहे. तर मतदारांनी नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याचे निकालावरून दिसून येते. जिल्ह्यातील ४७८ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने निवडणूक विभागाच्या वतीने निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यानुसार १ नोव्हेंबर रोजी मतदान घेण्याचे तर ३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. तत्पूर्वी २२ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या होत्या. गाव पातळीवर ग्रामपंचायत निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाल्याने ही निवडणूक अनेकांनी प्रतिष्ठेची केली होती. कधी नव्हे ती, चुरशीची लढत या निवडणुकीदरम्यान पहायला मिळाली. प्रमुख राजकीय पक्षांबरोबरच स्थानिक आघाड्यांनीही प्रचारात आघाडी घेत ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.या निवडणुकीत पक्षीय राजकारणापेक्षा अंतर्गत गटबाजी, भाऊबंदकी, हेवेदावे हेच अधिक प्रभावी ठरले असून, काही ठिकाणी ही निवडणूक व्यक्तीकेंद्रीत झाल्याचे दिसून आले. एकूणच सर्वच राजकीय पक्षांनी सर्वाधिक ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व असल्याचा दावा केला असला तरी खरे चित्र काही दिवसानंतर स्पष्ट होणार आहे. तर अनेक ठिकाणी सरपंच निवडीसाठी घोडेबाजार तेजीत येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.राजकारणावरील पकड ही गाव पातळीवरच्या निवडणुकीपासून सुरू होते. आपली पकड अधिक मजबूत व्हावी या दृष्टिने राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनीही सर्वशक्ती पणाला लावली होती. यातील काहींना यश आले तर काहींना अपयश. स्थानिक पातळीवरील निवडणूक ही पक्षविरहित होत असल्याचा अनुभव असला तरी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यासह अन्य पक्षांनी जिल्ह्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींवर आपल्या पक्षाचे वर्चस्व असल्याचा दावा केला आहे. निकालाचा अधिक तपशील हाती आल्यावरच या दाव्यातील सत्यता पुढे येऊ शकेल.