शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

छेडछाड, दादागिरीला विद्यार्थी वैैतागले

By admin | Updated: May 24, 2016 01:21 IST

औरंगाबाद : रत्नप्रभा मोटार्सशेजारी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या तरुण, तरुणींना गाठून लुटमार आणि छेडछाड केली जात आहे

औरंगाबाद : रत्नप्रभा मोटार्सशेजारी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या तरुण, तरुणींना गाठून लुटमार आणि छेडछाड केली जात आहे. या गुंडांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा, यासाठी सुमारे ७० तरुणांनी आज पोलीस आयुक्त अमितेशकु मार यांच्याकडे धाव घेतली.बाबा पेट्रोलपंप परिसरामागील अंतर्गत रस्त्यावर एक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र्र आहे. केंद्रात अभ्यास करण्यासाठी ये-जा करणाऱ्या तरुण, तरुणींना गाठून काही गुंड सतत दारूसाठी पैशाची मागणी करतात. पैसे देण्यास नकार देणाऱ्यांना ते मारहाण करतात. योगेश सुभाष आहेर या तरुणाला २१ मे रोजी दुपारी दोन अनोळखी गुंडांनी अडवून त्याच्याकडे पैशाची मागणी केली. त्याने पैसे नसल्याचे सांगताच आरोपींनी त्याच्या डोक्यात फरशी मारली. या घटनेत त्याला जबर दुखापत झाली आहे. याप्रकरणी त्याने क्रांतीचौक ठाण्यात तक्रार नोंदविली. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग, बँकिंगसह अन्य विभागांच्या परीक्षा देऊन शासकीय अधिकारी होण्यासाठी खेड्यापाड्यातून हे विद्यार्थी औरंगाबादेत आलेले आहेत. यातील अनेक जण रूम भाड्याने घेऊन राहतात, तर काही जण वसतिगृहात राहतात. अनेक तरुण, तरुणी एकट्याच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि अभ्यासिकेत ये-जा करतात. त्यांना सतत होणाऱ्या मारहाण आणि लुटमारीमुळे ते घाबरले आहेत.सिल्लोड तालुक्यातील निल्लोड या गावातून आलेला योगेश आहेर हा तरुण २१ मे रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अभ्यासिकेत पायी जात होता. त्यावेळी दोन गुंडांनी त्यास अडवले. यापैकी एकाने योगेशकडे दारूसाठी पैशाची मागणी केली. योगेशजवळ पैसेच नसल्याने त्याने तसे सांगितले. यावेळी त्यांनी त्याच्या खिशात हात घातला. खिशातील कागद खाली पडला म्हणून योगेश खाली वाकताच या गुंडांनी त्याच्या डोक्यात फरशी घातली. या घटनेत योगेशच्या डोळ्याखाली गंभीर जखम झाली. त्यानंतर त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले.घटना क्रमांकगजानन गोराडे या तरुणास रत्नप्रभा कॉम्प्लेक्सच्या बाजूच्या रस्त्यावर दोन तरुणांनी अडविले. आरोपींनी त्यास आमच्या विरोधात पोलिसांत तक्रार करतो का, असे म्हणून शिवीगाळ केली. याप्रसंगी बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर गजानन गोराडे यांनी पुन्हा आरोपीविरोधात क्रांतीचौक ठाण्यात तक्रार दाखल केली.घटना क्रमांकमनीषा पाटील आणि अनिता सोनवणे (नाव बदलले आहे) या दोन्ही तरुणींची चार दिवसांपूर्वी या गुंडांनी छेड काढली. त्यानंतर त्यांनी तातडीने दामिनी पथकाशी संपर्क साधून घडलेली घटना सांगितली. त्यावेळी दामिनी पथकाने त्यांच्याकडून घटनास्थळाची माहिती जाणून घेतली. मात्र, अर्धा तासानंतरही दामिनी पथक अथवा अन्य पोलिसांची मदत त्यांना मिळाली नाही. शिवाय एका तरुणीच्या घरासमोरून हे गुंड सतत ये-जा करीत असतात. त्यामुळे ते एखाद्या दिवशी आपल्या घरात घुसतील या भीतीपोटी आपण पोलीस आयुक्तांकडे धाव घेतल्याची त्यांनी सांगितले.