शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

५० किलो शेतमालाच्या वजनाची कडक अंमलबजावणी करा - खोतकर

By admin | Updated: June 28, 2017 00:41 IST

जालना : ५० किलोपेक्षा जास्त वजन असलेल्या शेतमालाची हाताळणी, चढ- उतार करण्यास हमाल, मापाडींच्या आरोग्यास घातक असल्याने ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या शेतमालाची वजनमाप बाजार समितीत करू नये.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ५० किलोपेक्षा जास्त वजन असलेल्या शेतमालाची हाताळणी, चढ- उतार करण्यास हमाल, मापाडींच्या आरोग्यास घातक असल्याने ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या शेतमालाची वजनमाप बाजार समितीत करू नये. याची सर्व व्यापारी, आडतिया, खरेदीदार, हमाल मापाडी आणि शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले आहे.बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत यावर याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या शेतमालाची हाताळणी करणे संबंधितांच्या आरोग्यास घातक ठरणारे असल्याने अशी हाताळणी करण्यास सर्वाेच्च न्यायालयाने असे मोजमापच करू नये, असा निर्णय दिला होता.यामुळे राज्य पणन महासंघाने १ फेब्रुवारी २०१६ रोजी परिपत्रक काढून राज्यातील सर्वच बाजार समितींना आदेशाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र याचे पालन होत नसल्याचे चित्र आहे. याची गंभीर दखल घेत राज्यमंत्री तथा सभापती अर्जुन खोतकर यांनी या निर्णयात कुठल्याही प्रकारे हलगर्जीपणा होता कामा नये म्हणून जालना बाजार समितीच्या संचालक मंडळाची बैठक घेतली. या निर्णयाचे काटेकोरपणे पालन व्हावे या उद्देशाने सभापती खोतकर यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत बाजार समितीतील आडतिया, व्यापारी, हमाल, मापाडी यांना कडक सूचना देत याची १ जुलैपासून बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात १०० किलोऐवजी ५० किलोमध्येच वजनमाप करण्यात यावे. अन्यथा संबंधितांविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री खोतकर यांनी स्पष्ट केले.बैठकीस उपसभापती भास्कर दानवे, सचिव गणेश चौगुले, संचालक मंडळ उपस्थित होते.