शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

पुणेरी फेट्यामुळे बेरोजगार तरूणाला मिळाले जगण्याचे बळ

By admin | Updated: July 16, 2016 01:13 IST

सितम सोनवणे , लातूर ‘हा छंद जीवाला लावी पिसे...’ असे म्हणतात ते उगीच नाही. छंद...! मग तो कोणताही असो, मनाला ओढ लावतो, तसेच घराला सावरतोही! असाच एक छंदिष्ट लातूरलाही आताशा परिचित झालेला आहे. ‘

सितम सोनवणे , लातूर‘हा छंद जीवाला लावी पिसे...’ असे म्हणतात ते उगीच नाही. छंद...! मग तो कोणताही असो, मनाला ओढ लावतो, तसेच घराला सावरतोही! असाच एक छंदिष्ट लातूरलाही आताशा परिचित झालेला आहे. ‘भारत फेटेवाले’ या नावाने त्यांना सर्वत्र ओळखले जाते.बारावी नापास झाल्यानंतर पुढे काय करावं, हा प्रश्न होताच. आर्थिक परिस्थितीही बेताचीच. घरचा कर्ता म्हणून काहीतरी केलं पाहिजे, त्यासाठी हॉटेलचे काम सोडून पुण्याला भावाकडे गेलो. पुण्याचा गणेशोत्सव हा जगप्रसिद्ध आहेच. या गणेशोत्सवात बांधलेल्या पुणेरी फेट्यांबाबत याच लातूरकराला आकर्षण निर्माण झाले. त्यातून फेटे बांधण्यासाठी चार-चार तास दुकानात थांबून ते पाहिले आणि हा छंद पुढे व्यवसायात रूपांतरित केला. लातुरातील दत्तात्रेय सुभाषराव टोंगळे यांचे वडील हॉटेलवर काम करीत. घरातील मोठा मुलगा म्हणून बारावीपर्यंत शिक्षण घेतले. पण त्यात नापास झालो. वडिलांसोबत हॉटेलवर काम करीत करीत एक पानटपरी सुरू केली. त्यातही मन रमेना म्हणून पुढे मोबाईल शॉपी सुरू केली. मध्ये अचानक पुण्यातील गणेशोत्सवासाठी गेलो. तेथील पुणेरी फेटे, त्यांचे हालते तुरे पाहून कुतूहल वाटले. आपल्याला फेटे बांधता येतील का, असा मनाला प्रश्न पडला. त्यातूनच एका फेटेवाल्याच्या दुकानात जाऊन तो बांधत असलेले फेटे तब्बल चार तास उभा राहून पाहिले. तेथून थेट परत गावाकडे आलो. चार महिने सलग घरी फेटे बांधण्याचा सराव केला.आणि एके दिवशी अचानक एका मित्राचा निरोप आला. नवरदेवाला आणि त्याच्या सहकाऱ्यांना फेटे बांधायचे आहेत, कोणी फेटेवाला मिळेल का? आत्मविश्वास जरी असला, तरी ‘हो’ म्हणण्याचे धाडस होईना. पण पुन्हा वाटले प्रयत्न करू. म्हणून नवरदेवासह १० जणांना फेटे बांधण्याचे ५०० रुपये सांगून त्याच्यासोबत गेलो आणि फेटे बांधले. फेट्याची बांधणी चांगली व सुंदर झाल्यामुळे नवरदेव आणि त्यांचे मित्र खूष झाले आणि त्या अल्पशा अनुभवातून लाखमोलाची प्रेरणा मला मिळाली. त्यानंतर मात्र मागे वळून बघण्याची फुरसत मिळाली नाही. आज १८ वर्षांपर्यंत लग्न, सामाजिक कार्यक्रम, महाविद्यालयीन कार्यक्रम, जयंत्या अशा विविध उपक्रमांतून महिन्यातील २० ते २५ दिवस फेटे बांधणीच्या कामात स्वत:ला गुंतवून घेतले आहे. लातुरात आलेल्या राहुल गांधींपासून ते अनेक मान्यवर व्हीआयपींना फेटे बांधून लातूरचे नाव राज्याच्या बाहेरही झळकावले असल्याचे त्यांनी सांगितले. कर्नाटकातील भालकी, बीदर, आंध्रातील जहिराबाद आदी ठिकाणीही फेटे बांधण्याचे त्यांनी काम केले आहे. या फेटे बांधणीच्या व्यवसायामुळे बेकारीवर मात केली आहे. दत्तात्रेय टोंगळे म्हणाले, माझ्यासोबत सात जणांना फेटे बांधण्याचे प्रशिक्षण देऊन सोबत घेतले आहे.