शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीमुळे पथदिवे बंद

By admin | Updated: March 26, 2017 23:00 IST

बीड : वीज ग्राहकांबरोबरच शासकीय कार्यालयांकडे महावितरणच्या थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस फुगत आहे

बीड : वीज ग्राहकांबरोबरच शासकीय कार्यालयांकडे महावितरणच्या थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस फुगत आहे. मार्च अखेरच्या अनुषंगाने वसुली मोहिमेत न.प.चे सहकार्य होत नसल्याने पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची नामुष्की आली आहे. पथदिव्यापोटी नगरपालिकेच्या विद्युत विभागाकडे ५७ कोटी ३१ लाख रूपये एवढी थकबाकी आहे.ग्राहकांबरोबरच शासकीय कार्यालयांनी बिले अदा करावीत या मागणीसाठी अधीक्षक अभियंता रतन सोनुले, कार्यकारी अभियंता जी. बी. घोडके यांनी शासकीय कार्यालयांना पत्रव्यवहार केला आहे. सोबतच प्रत्यक्ष भेटीवरही भर दिला. नगरपालिकेकडून मात्र थकबाकीचे मुद्दल डावलून केवळ महिन्याकाठी केवळ १२ ते १३ लाख रूपये महावितरणच्या कपाळी मारले जात आहेत. ही रक्कम तर व्याजापोटीच जमा होत आहे. शहरात पथदिव्यांचे कनेक्शन २५० ठिकाणी असून, जवळपास ३ हजारावर पथदिवे आहेत.मार्चअखेरची वसुली अंतिम टप्प्यात असून, वाढीव थकबाकी असलेल्या कार्यालयांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून आले आहेत. त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून सहयोगनगर, सुभाष रोड, शिवाजी चौक, नगर रोड या मुख्य बाजारपेठेतील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजबिल अदा न केल्यास ही केवळ अखंडितपणे सुरू राहणार असल्याचे अधीक्षक अभियंता रतन सोनुले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)