शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

भाववाढीसाठी सिरसाळ्यात रास्ता रोको

By admin | Updated: January 23, 2015 00:56 IST

सिरसाळा : उसाची एफआरपी प्रमाणे रक्कम देण्यात यावी, कापसाची हमी भावाने खरेदी करावी, या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सिरसाळा येथील परळी-

सिरसाळा : उसाची एफआरपी प्रमाणे रक्कम देण्यात यावी, कापसाची हमी भावाने खरेदी करावी, या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सिरसाळा येथील परळी-बीड मार्गावर असणाऱ्या मुख्य चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन केले. दोन तासाहून अधिक वेळ चाललेल्या या रास्ता रोकोमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुची वाहतूक ठप्प झाली होती. गुरुवारी आठवडी बाजाराचा वार असल्याने अनेकांची तारांबळ उडाली.वैद्यनाथ साखर कारखाना पांगरी, माजलगाव कारखाना तेलगाव आणि जय महेश पवारवाडी या तीन साखर कारखानदारांनी उसाचा पहिला १५०० रु. प्रमाणे भाव दिला परंतु एफआरपी प्रमाणे रक्कम दिली नाही. ती रक्कम एफआरपी प्रमाणेच देण्यात यावी, पाण्याअभावी वाळत चाललेला ऊस तात्काळ गाळपासाठी नेण्यात यावा तसेच कापसाचीही शासनाच्या हमी भावाप्रमाणे खरेदी करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. शासन अवलंबित असलेल्या प्रत्येक धोरणावर सडकून टीका करण्यात आली.या दोन्ही मागणीचे निवेदन परळीचे नायब तहसीलदार प्रमोदराव परळीकर यांना देण्यात आले. त्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे पी.एस. घाडगे यांच्यासहीत उत्तम माने, डॉ. पंढरीनाथ पवार, गंगाधर पोटभरे, सुदाम शिंदे, शिवाजीराव देशमुख आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना एक तास लागला.