औंढा नागनाथ : येथील जिंतूर टी पॉईंटवर भीमशक्तीच्या वतीने रविवारी सकाळी रास्ता रोको करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा खालसा येथे बौद्ध कुटुंबातील तिहेरी हत्याकांड घडून २0 दिवस उलटले तरी एकही मारेकरी पोलीस प्रशासनाच्या हाती लागलेला नाही. आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी भीमशक्तीच्या वतीने रविवारी सकाळी जिंतूर टी पांॅईंटवर रास्ता रोको करून औंढय़ाचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, सहायक पोलीस निरीक्षक अशोक चाटे व नायब तहसीलदार राजेश लांडगे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार एंगडे, तालुकाध्यक्ष अरविंद मुळे, शहराध्यक्ष एस.बी. मुळे, राजेश थोरात, राजू खंदारे, प्रशांत मुळे, छोटू कठाळे, प्रदीप कनकुटे, बाबूराव घोंगडे, अमोल घोंगडे, पं.स.सभापती राजेंद्र सांगळे, बाळू घनसावंत, सुरेश डांगे, पंडित खिल्लारे, भीमराव खिल्लारे, आकाश सुतारे, भिकाजी साळवे, प्रमोद कुलदीपके, किरण मोरे, सचिन मुळे, विलास मंडलिक, उत्तम साखरे, संघपाल खंदारे, धीरज कीर्तने, गौतम खिल्लारे, विजय खिल्लारे, सुमेध मुळे, प्रदीप खिल्लारे, किरण खिल्लारे, अतिश कापसे, अनिल नागरे, सुमेध साळवे, राजेश ढगे, किरण ढगे, तुळशीराम पडघन, लिंबाजी काशिदे, सुमेध जोंधळे, धम्मपाल खंदारे, राजू घनसावंत, नितीन घनसावंत, साहेबराव काशिदे, यशवंत साळवे, विजय खिल्लारे, मोतीराम कांबळे, शंकर पोले, सुधाकर वैराट, सुनील खंडागळे आदींच्या स्वाक्षर्या आहेत. आंदोलनात कार्यकर्ते सहभागी झाले होते. /(वार्ताहर)
जिंतूर टी पॉईंटवर रास्ता रोको
By admin | Updated: November 17, 2014 12:19 IST