रेणापूर/चाकूर : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी गुरुवारी रेणापुरात धनगर समाजाच्या वतीने बंद पाळण्यात येऊन तहसीलवर मोर्चा काढण्यात आला़ त्याचबरोबर चाकुरात जुन्या बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ अनुसूचित जमातीच्या यादीत धनगर ही जात असल्याचे स्पष्ट आहे़ १९७६ ला राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागाच्या उपसचिवांनी धनगड जातीचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, अशी शिफारस केली़ विशेष म्हणजे १ मे १९६० च्या महाराष्ट्र स्थापनेनंतर अनुसूचित जमातीच्या यादीत धनगड असा उल्लेख आहे़ महाराष्ट्रात धनगड ही जमात कोठेही नसल्याने धनगड म्हणजे धनगर असल्याचे स्पष्ट होते़ त्यामुळे धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यात यावा़ या मागणीसाठी गुरुवारी रेणापूर येथे शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते़ रेणापुरातील रेणुकादेवी मंदिरापासून सकाळी मोर्चा काढण्यात आला़ हा मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले़ यावेळी अॅड़ अण्णाराव पाटील, अनिरूद्ध येचाळे, गोविंद करडे, के़आऱवाघमोडे, दत्ता सरवदे, सतीश हाके, रामराव माने, मनोहर व्यवहारे, नाना कसपटे, दिलीप गोरके, दिलीप राजे, गोरे, गोपीनाथ हजारे, मुकेश राजे, कैलास होळकर, गहिनीनाथ लोहकरे, अश्रुबा चोरमले, हणमंत शेंडगे आदी सहभागी झाले होते़ दरम्यान, गावातील बाजारपेठ सायंकाळपर्यंत बंद होती़ त्यामुळे गावातील व्यवहार संपूर्णपणे ठप्प झाले होते़(वार्ताहर)वाहतूक काही काळ ठप्प़़़चाकूर येथील जुन्या बसस्थानकासमोर धनगर समाजाच्या वतीने गुरुवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनात अॅड़ माधवराव कोळगावे, गंगाधर केराळे, दयानंद सुरवसे, सुरेश हाके, मिलिंद महालिंगे, माधव गाडेकर, शिवाजी खांडेकर, बालाजी देवकत्ते, नारायण राजुरे, बाबाराव पाटील, अजित खंदारे, अशोक करडीले, विवेकानंद लवटे, पवन सूर्यवंशी सहभागी झाले होते़
धनगर समाजाचा रास्ता रोको, बंद
By admin | Updated: August 1, 2014 00:25 IST