शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

तीर्थक्षेत्र तुळजापुरातील प्रसादाच्या लाडूची विक्री बंद

By admin | Updated: December 9, 2015 00:40 IST

उस्मानाबाद : तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे देवीभक्तांसाठी मागील सात वर्षांपासून वाटप करण्यात येणाऱ्या प्रसादरूपी लाडूची मागील आठ दिवसांपासून विक्री बंद पडली आहे़

उस्मानाबाद : तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे देवीभक्तांसाठी मागील सात वर्षांपासून वाटप करण्यात येणाऱ्या प्रसादरूपी लाडूची मागील आठ दिवसांपासून विक्री बंद पडली आहे़ मंदिर संस्थानकडे १६ लाख बील थकल्याने ठेकेदाराने लाडू पुरवठा बंद केला असून, मंदिरात प्रसादाचे लाडू मिळत नसल्याने भाविकांमधून मात्र, तीव्र संताप व्यक्त होत आहे़तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सन २००८ पासून प्रसाद रुपी लाडूची विक्री केली जात होती. मंदिर समितीकडून एक लाडू दहा रूपये प्रमाणे विक्री केला जात असे. लाडूच्या विक्रीतून लाखोंचा नफा मंदिर संस्थानला मिळत असताना या संस्थानने मागील सात वर्षांपासून तिरूपतीच्या धर्तीवर लाडू तयार करणारी यंत्रणा उभा केलेली नाही़ प्रत्येक वर्षी लाडू निर्मितीचे टेंडर दिले जात आहे़ सध्या लाडूचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराचे सप्टेंबर ते नोव्हेंबर २०१५ या तीन महिन्यांच्या कालावधीतील १६ लाख रूपये थकले आहेत़ त्या ठेकेदाराने मंदिर संस्थानकडे वेळोवेळी खेटे मारूनही थकीत बिलाची रक्कम मिळत नसल्याने अखेर संस्थानला लेखी पत्र दिले आहे़ या पत्रात थकबाकी दिल्याशिवाय लाडूचा पुरवठा केला जात नसल्याचे नमूद केले होते़ मात्र, मंदिर प्रशासनाने याची कुठलीच दखल न घेतल्याने ठेकेदाराने लाडूचा पुरवठा मागील आठ दिवसांपासून बंद केला आहे़ दरम्यान, सर्व यंत्रणा असतानाही तुळजाभवानी मंदीर संस्थानकडून लाडू निर्मितीसाठी स्वत:ची यंत्रणा उभी करण्याकडे डोळेझाक होताना दिसत आहे़ दरम्यान, याबाबत मंदिर संस्थानचे सहाय्यक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रूग्णालयात असल्याचे कारण पुढे केले़ तर इतर अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही़ (प्रतिनिधी)