शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

अवैध उपसा थांबवा

By admin | Updated: April 8, 2017 00:05 IST

बीड : शहराला माजलगाव बॅक वॉटर येथून पाणीपुरवठा होतो. बॅक वॉटरवरून सध्या अवैध पाणी उपसा केल्याचे समोर येत आहे.

बीड : शहराला माजलगाव बॅक वॉटर येथून पाणीपुरवठा होतो. बॅक वॉटरवरून सध्या अवैध पाणी उपसा केल्याचे समोर येत आहे. ही परिस्थिती कायम राहिली तर बीड शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल. यासाठी बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेऊन अवैध पाणी उपसा थांबवा, अशी मागणी केली.यावेळी आरडीसी चंद्रकांत सुर्यवंशी, न.प.चे मुख्याधिकारी प्रशांत खांडकेकर, माळवदकर सहाय्यक नगररचनाकार सलीम भाई, लईक भाई आदिंची उपस्थिती होती. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी गेल्या आठवड्यात माजलगाव बँक वॉटर व पाली धरणातील शेतीसाठी होत असलेला अवैध पाणी पुरवठा बंद करण्यासंदर्भात तसेच हा उपसा बंद न झाल्यास बीड शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यास अडथळा निर्माण होण्याची शक्यता असून भविष्यात अशीच परिस्थिती राहिल्यास गंभीर पाणीप्रश्न निर्माण होऊ शकतो तसेच आपण संबंधित अधिकाऱ्यांना अवैध पाणी उपसा करणाऱ्या मोटारी, पंप जप्त करून अवैध उपसा बंद करण्याच्या सूचना द्याव्यात असे त्यांनी यावेळी सांगितले. माजलगाव धरणातून मोठ्या प्रमाणात मोटारीने पाणी उपसा चालू असून आज रोजी धरणात केवळ ५० टक्के पाणी शिल्लक आहे. नागरिकांनी नळाला तोट्या बसवून पाण्याचा काटकसरीने वापर करून न.प.प्रशासनाला सहकार्य करावे, असे निवेदनात म्हटले आहे.यावेळी जिल्हाधिकारी यांनी सदरील निवेदन लक्षात घेऊन माजलगाव येथील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून होत असलेला अवैध पाणी उपसा थांबविण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. उन्हाळ्याचे अजून दोन महिने बाकी आहेत. या दरम्यान पाणी जपून वापरणे आवश्यक आहे. बीड शहराच्या पाणी प्रश्नावरून नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर दक्ष असल्याचे शुक्रवारी पहावयास मिळाले. याशिवाय, बीड शहरातील गरीबांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. (प्रतिनिधी)