शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

जालना रेल्वेस्थानकावरील मालवाहतूक बंद

By admin | Updated: June 11, 2014 00:34 IST

जालना - माल उतरविण्यास नऊ तासांपेक्षा अधिक विलंब झाल्यास लागणाऱ्या डेमरेज (दंड) चे दर रेल्वे प्रशासनाने दुपटीने वाढविल्याने व्यापाऱ्यांनी रेल्वेद्वारे मालवाहतूक बंद केली आहे.

जालना - रेल्वे वॅगनमधून माल उतरविण्यास नऊ तासांपेक्षा अधिक विलंब झाल्यास लागणाऱ्या डेमरेज (दंड) चे दर रेल्वे प्रशासनाने दुपटीने वाढविल्याने दोन दिवसांपासून व्यापाऱ्यांनी रेल्वेद्वारे मालवाहतूक बंद केली आहे. त्याचा फटका हमाल-मापाडींनाही बसला असून त्यांची उपासमार होत आहे.रेल्वे प्रशासनाने डेमरेजचे दर दुप्पट केल्याने व्यापाऱ्यांनी दोन दिवसांपासून रेल्वे वॅगनद्वारे मालाची ने-आण करणे बंद केले आहे. त्यामुळे जालना मालधक्क्यावर दोन दिवसांपासून कोणतीही मालवाहतूक करणारी रेल्वे आली नाही. रेल्वे वॅगनद्वारे आलेला माल मालधक्क्यावर उतरविण्यासाठी संबंधित व्यापाऱ्यांना ४ तासांची वेळ मर्यादा दिली जाते. ४ तासांपेक्षा अधिक वेळ लागल्यास डेमरेज द्यावा लागतो. यापूर्वी डेमरेज प्रतिवॅगन प्रतितास १५० रुपये आकारले जात होते. मात्र काही दिवसांपासून रेल्वे प्रशासनाने डेमरेजच्या दरांमध्ये दुपटीने वाढ केली आहे. त्यामुळे आता ४ तासांपेक्षा अधिक वेळ लागल्यास ३०० रुपये प्रतितास इतका डेमरेज आकारला जातो. डेमरेजचे दर वाढविल्यामुळे काही व्यापाऱ्यांकडून विरोध होत आहे. या विरोधामुळे संबंधित व्यापाऱ्यांनी मालाची ने-आण करणे बंद केले आहे. परिणामी, दोन दिवसांत एकही मालगाडी मालधक्क्यावर आली नाही. या मालधक्क्यावर १५० हमाल रोजंदारी करतात. मात्र मालवाहतूक बंद झाल्याने दोन दिवसांपासून त्यांची उपासमार सुरू आहे. त्याचप्रमाणे ६० ट्रकचालकांचेही काम बंद झाले आहे. त्यामुळे ट्रक या धक्क्यासमोरच उभ्या आहेत. ही मालवाहतूक केव्हा सुरू होईल, हे निश्चित नसल्याचेही सांगण्यात आले. (प्रतिनिधी)रेल्वे प्रशासनाकडून मात्र इन्कार मालधक्क्यावरील काही हमालांशी संपर्क साधला असता तीन-चार दिवसांपासून मालवाहतूक बंद असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आमची उपासमार होत असल्याचेही ते म्हणाले. स्थानिक रेल्वे प्रशासनाने मालवाहतूक बंद असल्याबद्दल इन्कार केला आहे. स्थानकप्रमुख विजयसिंग वळवी म्हणाले की, मालवाहतूक नेहमीप्रमाणे सुरू आहे. ती बंद नाही, असा दावा त्यांनी केला.गव्हाचा माल येणार रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मालधक्क्यावर मालाची ने-आण करण्याचे काम बंद झालेले नाही. तीन दिवसांपूर्वी येथे खताचा माल उतरविण्यात आला होता. आज रात्री उशिरा किंवा उद्यापर्यंत गव्हाचा माल जालना रेल्वेस्थानकावर पोहोचणार आहे.