पैठण : संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी भाजपचे तालुकाध्यक्ष तुषार पाटील शिसोदे तर व्हाईस चेअरमनपदी भास्कर नाना राऊत यांची मंगळवारी निवड झाली १२ विरुद्ध ९ मतांनी त्यांच्याच पॅनलच्या अप्पासाहेब रामकृष्ण पाटील व ज्ञानेश औटे यांचा त्यांनी पराभव केला. निवडणूक प्रक्रिया सुरू असताना व निवडणूक झाल्यानंतर उपस्थित शेतकरी व जमावाने माजी आमदार संजय वाघचौरे व कारखाना चालविण्यास घेतलेल्या सचिन घायाळ यांच्या विरोधात रोष व्यक्त करीत घोषणाबाजी केली. निवडणुकीनंतर आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी कारखान्यावर दगडफेक केली. या वेळी पोलिसांना परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. या दरम्यान जोरदार पाऊस सुरू झाल्याने कारखान्याभोवती जमलेली गर्दी दूर झाली व परिस्थिती नियंत्रणात आली. कारखान्यात परिवर्तन घडवून आणलेल्या परिवर्तन पॅनलमध्येच मंगळवारी दोन गट पडले. माजी आमदार संजय वाघचौरे, तुषार शिसोदे, अप्पासाहेब पाटील व सचिन घायाळ यांनी तयार केलेल्या परिवर्तन पॅनलचे १८ उमेदवार विजयी झाले होते. या पॅनलच्या एकत्रीकरणाच्या वेळेस अप्पासाहेब (पान २ वर)कर्जमुक्तीसोबतच कारखान्याच्या हितासाठी राजकारण कारखान्यापासून दूर ठेवण्यात येईल, असे नवनिर्वाचित व्हाईस चेअरमन भास्कर राऊत यांनी प्रतिक्रिया दिल्या.४कारखाना स्वबळावर चालविण्याची भूमिका घेतल्याने मला चेअरमन होऊ दिले नाही. कारखाना शेतकऱ्यांचा असल्याने मी कारखाना स्वबळावर चालविण्याची भूमिका घेतली. परंतु यास वाघचौरे व शिसोदे यांनी विरोध करीत मला चेअरमन होण्यापासून रोखले, असा आरोप अप्पासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. यावेळी अन्नदाता शेतकरी संघटनेचे जयाजीराव सूर्यवंशी व शेतकरी यांनी ठरल्याप्रमाणे अप्पासाहेब पाटील यांना चेअरमन न केल्याने काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला. याच वेळी पॅनलमधील एकमेव मुस्लिम उमेदवाराच्या पराभवास जबाबदार धरून परिवर्तनच्या संचालकाचा अब्दुल गनी बागवान यांनी फलक लावून निषेध नोंदवला.आ. संदीपान भुमरे यांच्यासह संचालक प्रल्हाद औटे व प्रकाश क्षीरसागर यांनी अप्पासाहेब पाटील यांना मतदान केल्याचे त्यांनी सांगितले तर अहिल्याबाई झारगड, आसाराम शिंदे, ज्ञानेश औटे, मुक्ताबाई गोर्डे, आबासाहेब मोरे हे संचालक अप्पासाहेब पाटील यांच्यासोबत राहिले.
निवडणुकीनंतर कारखान्यावर दगडफेक
By admin | Updated: July 13, 2016 00:43 IST