शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
4
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
5
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
6
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
7
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
8
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
9
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
10
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
11
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
12
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
13
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
14
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
15
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
16
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
17
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
18
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
19
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
20
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 

पथकावर दगडफेक

By admin | Updated: September 8, 2015 00:44 IST

औरंगाबाद : शिवाजीनगर - रामनगर रस्त्यात येणारी घरे पाडण्यासाठी महानगरपालिकेचे पथक सोमवारी मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनजवळ पोहोचले.

औरंगाबाद : शिवाजीनगर - रामनगर रस्त्यात येणारी घरे पाडण्यासाठी महानगरपालिकेचे पथक सोमवारी मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनजवळ पोहोचले. मात्र, संतप्त नागरिकांनी पाडापाडीच्या कारवाईला तीव्र विरोध करून जेसीबीवर दगडफेक केली. त्यामुळे मनपाला ही कारवाई थांबवावी लागली. यानंतरही स्थानिक नागरिकांनी दिवसभर येथे ठिय्या आंदोलन केले. आधी पर्यायी जागा आणि नंतरच कारवाई करा, अशी मागणी या नागरिकांनी केली.मनपाने चार दिवसांपूर्वीच मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन ते शिवाजी चौक हा रस्ता मोकळा केला. याठिकाणी दीडशेहून अधिक इमारती भुईसपाट करण्यात आल्या. त्याची धूळ खाली बसवण्यापूर्वी मनपा प्रशासन येथूनच जाणारा शिवाजीनगर-रामनगर हा आणखी एक रस्ता मोकळा करण्यासाठी सरसावले आहे. त्यासाठी शुक्रवारी जयभवानीनगर आणि विश्रांतीनगरात काही ठिकाणी मार्किंग करण्यात आली. शनिवारी मात्र, राहिलेल्या भागात मार्किंग करण्यास नागरिकांनी विरोध केला होता. त्यानंतर आज मनपाचे पथक याठिकाणी पाडापाडीच्या कारवाईसाठी पोहोचले. कारवाईला सुरुवात करताच स्थानिक रहिवाशांनी त्याला जोरदार विरोध केला. दगडफेकीनंतर मनपाने पाडापाडीची कारवाई थांबविली, पण त्यानंतरही राहिलेल्या भागात मार्किंगचे काम मात्र सुरूच होते. ४मनपाच्या पथकाने राहिलेल्या भागात मार्किंग पूर्ण केले. या पथकात नगररचना विभागातील उपअभियंता ए. बी. देशमुख, नितीन गायकवाड, काही इमारत निरीक्षक आणि इतरांचा समावेश होता.मार्किंगला आमचा विरोध नाही; परंतु मनपाने आधी एकत्रित पंचनामे करावेत आणि आम्हाला पर्यायी जागा द्यावी, अशी आमची मागणी आहे. त्याशिवाय आम्ही बुलडोझर चालवू देणार नाही, असे आंदोलनकर्त्यांच्या वतीने भाकपचे शहर सचिव मधुकर खिल्लारे यांनी सांगितले. नागरिकांनी शनिवारी जिल्हाधिकारी निधी पांडे यांना भेटून ही कारवाई थांबविण्याची मागणी केली होती. पांडे यांनी सोमवारी अप्पर जिल्हाधिकारी सोरमारे हे पाहणी करतील, असे आश्वासन दिले. त्यानुसार आज हे नागरिक मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनसमोरील चौकात सोरमारे यांची वाट बघत थांबले होते. परंतु दुपार झाली तरी जिल्हा प्रशासनाचे कुणीच प्रतिनिधी तिकडे फिरकले नाहीत. उलट मनपाचे पथक पाडापाडीसाठी धडकले. त्यामुळे नागरिक अधिकच संतापले.