शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘पेट’ परीक्षा पुन्हा लांबणार

By admin | Updated: June 28, 2017 00:51 IST

औरंगाबाद : मागील दोन वर्षांपासून रखडलेली पीएच. डी. प्रवेश परीक्षा (पेट-४) घोषित करण्यात आल्यानुसार २ जुलै रोजी घेण्यात येणार नाही, यावर शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मागील दोन वर्षांपासून रखडलेली पीएच. डी. प्रवेश परीक्षा (पेट-४) घोषित करण्यात आल्यानुसार २ जुलै रोजी घेण्यात येणार नाही, यावर शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. परीक्षेची नवीन तारीख घोषित करण्यासाठी मंगळवारी सर्व अधिष्ठातांची बैठक बोलावण्यात आली होती; मात्र त्यात मुहूर्त निघाला नसल्याचे समजते. यासाठी उद्या, बुधवारी सकाळी १० वाजता पुन्हा बैठक होणार आहे.विद्यापीठाने २८ जुलै २०१६ रोजी ‘पेट-४’साठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले होते, तेव्हापासून आतापर्यंत पेट परीक्षा झालेलीच नाही. मागील महिनाभरापूर्वी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी पेट परीक्षा २ जुलै रोजी होणार असल्याची घोषणा केली होती; मात्र ही घोषणाही हवेतच विरणार असल्याचे स्पष्ट झाले. पेट परीक्षा आॅनलाईन घेण्याचा निर्णय तत्कालीन बीसीयूडी संचालक डॉ. सतीश पाटील यांनी घेतला. यासाठी वुई शाईन या कंपनीला लाखो रुपयांचे कंत्राटही देण्यात आले; मात्र या कंपनीमुळे परीक्षेला उशीर होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कुलगुरूंनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलेल्या तारखेला परीक्षा न होण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढावली आहे. आता ही परीक्षा केव्हा घ्यायची, यासाठी मंगळवारी सायंकाळीच अधिष्ठातांची बैठक बोलावण्यात आली होती; मात्र यात कोणताही निर्णय झाला नाही, त्यामुळे बुधवारी सकाळी पुन्हा एकदा ही बैठक होणार आहे. या बैठकीत नवीन तारीख ठरण्याची शक्यता आहे. याविषयी पेट-४ ची जबाबदारी असलेले प्रभारी अधिकारी डॉ. सतीश पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.व्यवस्थापन परिषदेची बैठक स्थगितव्यवस्थापन परिषदेची मंगळवारी होणारी बैठक दुपारनंतर सुरू झाल्यामुळे सर्व विषय पूर्ण झाले नाहीत. रात्री ८ वाजेपर्यंत ही बैठक चालल्यानंतर स्थगित करण्यात आली आहे. उद्या, बुधवारी सकाळी ११ वाजता पुन्हा व्यवस्थापन परिषदेची बैठक होणार आहे. यात साई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संलग्नीकरण रद्द करण्याच्या निर्णयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेअंती साईचे प्रथम वर्षाचे संलग्नीकरण रद्द करण्यात आले असल्याचे समजते; अधिकृत माहिती बैठक संपल्यानंतरच देण्यात येईल.