शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

वैजापूर तहसीलचे मैदान ‘चोरीला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:24 IST

अतिक्रमणाचा विळखा : समस्यांनी नागरिकांचे हाल; अधिकाऱ्यांचे कायम दुर्लक्ष

मोबीन खानवैजापूर : येथील तहसील कार्यालयाचे मैदान चोरीला गेले आहे. उपोषण करण्यासाठी असलेले मैदान अणि वाहन उभे करण्यासाठी असलेली जागा गायब झाल्या असून तेथे अतिक्रमण झाले आहे. परंतु, हे मैदान कोणी गायब केले, त्याचे मालक कोण, याचे उत्तर महसूल विभागाकडेही नाही. आश्चर्य म्हणजे या अतिक्रमणधारकांवर कोणताही कागदोपत्री कार्यवाहीचा पुरावा नाही.वैजापूर शहरात अतिशय महत्त्वाचा आणि सतत गजबजलेला परिसर म्हणून तहसील कार्यालयाची ओळख आहे. मात्र, तहसीलच्या हद्दीत असलेल्या मोकळ्या जागेवर ही अतिक्रमणे झालेली आहेत. खोकी टाकून, काही जणांनी पत्राशेड मारून, काहींनी तहसीलच्या भिंती पाडलेल्या आहेत आणि लोखंडी आधार उभा करून शेकडो चौरस फूट जागेवर फुकटात ताबा घेतलेला आहे. तहसील आवारातील इतके मोठे मैदान अशाप्रकारे गायब होऊन तेथे अतिक्रमण झाले आहे.याठिकाणी आता चहाचे हॉटेल, सेतू केंद्र, झेरॉक्स सेंटर अवतरले आहे. या जागेवर अतिक्रमण करणाºया जादुगाराचा शोध घेण्यासाठी महसूल यंत्रणा संमोहित झाल्याप्रमाणे शांत बसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अतिक्रमण, अनावश्यक मनमानी बदल आणि जाहिरात फलकांचा भडीमार यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, खुलेआम झालेल्या जागेतील अतिक्रमणास कुणाचे संरक्षण आहे, याविषयी चर्चा सुरू झालेली आहे.तहसील परिसरातील मोकळ्या जागेत झालेली ही अतिक्रमणे अधिकाºयांना दिसत कशी नाहीत, असाही सवाल उपस्थित केला जात आहे. ही अतिक्रमणे हटवून तहसील परिसरात केलेले बेकायदा अतिक्रमण काढले जाणार का, याकडे वैजापूरकरांचे लक्ष लागले आहे.मोक्याच्या जागी वाहनतळाचा प्रश्नशहरातील शासकीय कार्यालये, बँका व इतर मोक्याच्या ठिकाणी वाहतुकीची समस्या आहे. शहराचा विस्तार वाढत असताना वाहनतळाचा प्रश्न जटील बनला आहे. बेशिस्तपणाचा कळस सामान्य माणसाला चांगलाच त्रासदायक ठरतोय. तहसील आवारात तर तहसीलदारांच्या कॅबिनपर्यंत वाहने लावली जातात. शासकीय कार्यालयांमध्ये विविध कामांसाठी दररोज शहरी व ग्रामीण भागातील असंख्य नागरिक येत असतात. वाहनतळाची व्यवस्था नसल्याने ही मंडळी भररस्त्यावर वाहने लावतात. त्यात दुचाकीस्वारांची संख्या अधिक आहे. तहसील कार्यालयासमोर तहसीलदारांचे वाहन, मुख्याधिकारी व राजकीय पुढाºयांची वाहने उभी असतात. वाहन बाहेर काढताना चालकास कसरत करावी लागते. नगरपालिका व तहसील ही दोन्ही कार्यालये एकाच ठिकाणी असल्यामुळे दररोज हजारो नागरिक कामानिमित्त येत असतात.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागEnchroachmentअतिक्रमण