शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

टमटम चोरी; दोघांना उचलले

By admin | Updated: July 28, 2016 00:55 IST

लातूर : शहरासह परिसरातील गावातील टमटमची रात्रीच्या वेळी चोरी करुन ते पुण्यात अवैध प्रवासी वाहतुकीसाठी विकणाऱ्या टोळीतील दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

लातूर : शहरासह परिसरातील गावातील टमटमची रात्रीच्या वेळी चोरी करुन ते पुण्यात अवैध प्रवासी वाहतुकीसाठी विकणाऱ्या टोळीतील दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. दोघांकडून तीन टमटमसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ लातूर शहरासह परिसरातील गावात घरासमोर पार्किंग करण्यात आलेल्या टमटमवर डोळा ठेवून, रात्रीच्यावेळी त्याची चोरी करणारी टोळी सक्रिय होती. दरम्यान, चिंचोली बल्लाळनाथ येथील टमटम चोरी गेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात २४ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर एमआयडीसी पोलिसांनी या टोळीचा तपास सुरु केला. चिंचोली बल्लाळनाथ येथील इसूफ दस्तगीर शेख (२७) हा या टोळीत प्रमुख असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने पुणे शहर गाठले. अलेगाव गावठाण (ता. हवेली जि. पुणे) येथील बाळासाहेब राजाराम कोंढरे (३०) याच्यासोबतीने तो चोरीतील टमटम पुण्यात अवैध प्रवासी वाहतुकीसाठी विकायचा. पोलिस पथकाने या दोघांनाही पुण्यातून तीन टमटमसह अटक केली आहे.