शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्ह्यात नऊ तालुक्यांचे कारभारी महाविकास आघाडीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 12:52 IST

जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयावर झेंडा फडकविलेल्या महाविकास आघाडीने नऊ पंचायत समित्या ताब्यात घेत विरोधकांना धोबीपछाड दिला. जिल्ह्यातील १४ पैकी नऊ पंचायत समित्यांमध्ये सभापती व उपसभापती बसविण्यात महाविकास आघाडीला यश आले.

अण्णा नवथर / अहमदनगर : जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयावर झेंडा फडकविलेल्या महाविकास आघाडीने नऊ पंचायत समित्या ताब्यात घेत विरोधकांना धोबीपछाड दिला. जिल्ह्यातील १४ पैकी नऊ पंचायत समित्यांमध्ये सभापती व उपसभापती बसविण्यात महाविकास आघाडीला यश आले असून, विरोधकांना चार पंचायत समित्यांवर समाधान मानावे लागले. महाविकास आघाडीने तालुक्याच्या राजकारणातही वर्चस्व निर्माण केल्याचे पंचायत समित्यांच्या निवडणुकीतून अधोरेखित झाले आहे. जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि क्रांतिकारी हे चार पक्ष एकत्र आले. त्यामुळे भाजपाला सपशेल माघार घ्यावी लागली. पंचायत समितींच्या सभापती व उपसभापती पदासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीतही चारही पक्षांनी एकीचा नारा देत विरोधकांसमोर आव्हान उभे केले होते. जिल्ह्यातील एकूण १४ पंचायत समितींचे सभापती व उपसभापती पदासाठी निवडणुका घेण्यात आल्या. जामखेड वगळता १३ पंचायत समितींचे सभापती व उपसभापती निवडण्यात आले. राष्ट्रवादीने कोपरगाव, शेवगाव, राहुरी, श्रीगोंदा आणि कर्जत या पंचायत समित्यांमध्ये एक हाती सत्ता मिळविली. संगमनेर पंचायत समितीचे सभापती व उपसभापती काँग्रेसचे झाले. नगर व पारनेर पंचायत समितीवर शिवसेनेचा झेंडा फडकला. नेवासा पंचायत समितीची सत्ता क्रांतिकारी शेतकरी पक्षाने कायम ठेवली.श्रीगोंदा आणि कर्जत पंचायत समितीत राष्ट्रवादीने भाजपाला धोबीपछाड दिला. राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप हे तालुक्याच्या राजकारणात सक्रि य झाले. त्यांनी या निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावत पंचायत समिती ताब्यात घेतली. कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे रोहित पवार व जिल्हाध्यक्ष राजेंद्र फळके यांनी राजकीय खेळी करत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले. पारनेर पंचायत समितीचे सभापती पद सेनेकडे, तर उपसभापती पद राष्ट्रवादीकडे आले. या तालुक्यात शिवसेना व राष्ट्रवादी हे पक्ष प्रथमच एकत्र आले. नगर तालुक्यात काँग्रेस व शिवसेनेने आघाडी करत पंचायत समितीची सत्ता राखली. अकोले पंचायत समितीत राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला. ही पंचायत समिती भाजपने ताब्यात घेत राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर केले. काँग्रेसमधील विखे गटाने श्रीरामपूर व राहाता पंचायत समितीची सत्ता कायम ठेवली. पाथर्डीच्या भाजपाच्या आमदार मोनिका राजळे यांनी पंचायत समितीची सत्ता राखली.

 जिल्हा परिषदेनंतर झालेल्या पंचायत समितीत महाविकास आघाडीने एकत्र येत नऊ पंचायत समित्यांमध्ये सत्ता स्थापन केली आहे. तालुक्याच्या राजकारणातही चारही पक्ष एक झाले असून, यापुढील निवडणुकाही महाविकास आघाडी एकत्रित लढतील, असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी सांगितले.    

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरpanchayat samitiपंचायत समितीPresidentराष्ट्राध्यक्षElectionनिवडणूक