शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

मौजमजेसाठी मित्रांच्याच गाड्या चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 23:44 IST

स्वत: काही कामधंदा न करता अय्याशीचे जीवन जगण्याची सवय लागल्याने मौज-मजेसाठी मित्रांच्याच दुचाकी पळवून नेणाऱ्यास सिडको पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकाने जेरबंद केले असून, त्याने परभणी येथे वसतिगृहात दडवून ठेवलेल्या २ लाख २५ हजार रुपये किमतीच्या मोटारसायकली काढून दिल्या आहेत.

ठळक मुद्देसिडको पथकाची कारवाई : आरोपीने ६ गाड्या परभणीतून काढून दिल्या

औरंगाबाद : स्वत: काही कामधंदा न करता अय्याशीचे जीवन जगण्याची सवय लागल्याने मौज-मजेसाठी मित्रांच्याच दुचाकी पळवून नेणाऱ्यास सिडको पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकाने जेरबंद केले असून, त्याने परभणी येथे वसतिगृहात दडवून ठेवलेल्या २ लाख २५ हजार रुपये किमतीच्या मोटारसायकली काढून दिल्या आहेत.धीरज अंकुश चव्हाण (रा. लातूर, ह.मु. एन-६ सिडको, सिंहगड कॉलनी), असे पोलिसांनी पकडलेल्या वाहन चोराचे नाव आहे. पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिलेली माहिती अशी की, धीरज हा स्थानिक मित्राची गाडी घेऊन जायचा आणि मास्टर चावी बनवून ती आणून देत असे, संधी मिळाली की, आठवडाभरात ती गाडी चोरून न्यायचा. ती गाडी सरळ ओळखीच्या मित्राकडे परभणी येथे घेऊन जायचा आणि मित्राला काही पैशाची मागणी करायचा. पैशाच्या बदल्यात ही गाडी ठेवून घे. पैसे आल्यावर घेऊन जाईन, असे सांगात होता. ओळखीचा असल्याने व औरंगाबादेत वास्तव्यास असल्याने मित्राच्या मदतीने गाड्या इतरांना विक्री करण्याचा सपाटा त्याने लावला होता.सिंहगड कॉलनीत राहणारा धीरज अंकुश चव्हाण हा कामाला नाही. मग हा नवीन गाड्या आणि पैसा कसा उडवितो, असा संशय काही लोकांना आला. चोरीच्या गाड्या परभणी येथे लपवून ठेवल्या असून, तो विक्री करणार आहे, अशी खात्रीलायक माहिती खबºयाकडून पोलिसांना मिळाली. त्यावरून डी.बी. पथकाने त्यास पकडून विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी अधिक विश्वासात घेऊन विचारले असता त्याने गाड्या चोरल्याची कबुली दिली अन् दडवून ठेवलेल्या सहा गाड्यादेखील काढून दिल्या आहेत.चव्हाण याने अजून किती दुचाकी पळविल्या, त्यांची विल्हेवाट कुठे लावली, याचा शोध सिडको ठाण्याचे पोलीस नाईक विजयकुमार वाघ करीत आहेत.या पथकाने केली कारवाईही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, हलवादार नरसिंह पवार, प्रकाश डोंगरे, सुरेश भिसे, विजय भानुसे, विजयकुमार वाघ यांच्या पथकाने परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या सहकार्याने केली. 

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारी