शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

प्रवेशासाठी पालकांचे जागते रहो...

By admin | Updated: May 21, 2014 00:48 IST

नांदेड : उन्हाळी सुट्या संपत आल्या़ त्यामुळे सगळीकडे शाळांतील प्रवेशासाठी पालकवर्गाची धांदलघाई सुरु आहे़

नांदेड : उन्हाळी सुट्या संपत आल्या़ त्यामुळे सगळीकडे शाळांतील प्रवेशासाठी पालकवर्गाची धांदलघाई सुरु आहे़ चांगल्या शाळेत प्रवेशाच्या धडपडीत काही पालकांनी तर दोन-दोन दिवसांची रजाही टाकली असून दुसर्‍या दिवशी मिळणार्‍या बालवाडीच्या प्रवेशअर्जासाठी आदल्या दिवशी पहाटेपासूनच पालकांनी रांग लावली होती़ तर काहींनी विद्येच्या मंदिराबाहेरच जागरण केले़ यंदा शाळांतील प्रवेश वाढविण्यासाठी मनपा प्रशासनाने तयारी केली आहे़ त्यासाठी मुख्याध्यापकांना सर्वेक्षणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ गतवर्षी मनपाच्या शाळाही हाऊसफुल्ल झाल्या होत्या़ त्यामुळे यंदाही प्रवेश वाढतील अशी प्रशासनाला अपेक्षा आहे़ तर दुसरीकडे खाजगी शाळांची प्रवेश प्रक्रिया मात्र सुरु झाली आहे़ शहरातील काही नामवंत शाळांमध्ये बालवाडी व पहिल्या वर्गाचे प्रवेशअर्ज वाटपाचे काम सध्या सुरु आहे़ आपल्या पाल्याला चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी पालकवर्गाची कितीही शुल्क द्यावयाची तयारी आहे़ त्याचबरोबर लागेबांधीलाही सध्या ऊत आला आहे़ गुजराती हायस्कुलमध्ये बालवाडीची प्रवेश प्रक्रिया बुधवारपासून सुरु होणार आहे़ प्रवेशअर्जही बुधवारी सकाळी आठ वाजेपासून देण्यात येणार आहेत़ हे प्रवेश अर्ज मिळविण्यासाठी शेकडो पालकांनी मंगळवारी सकाळपासूनच शाळेबाहेर रांग लावण्यास सुरुवात केली़ ४० अशांच्या तळपत्या उन्हापासून बचाव करीत पालकवर्ग दिवसभर रांगेत उभे होते़ शाळेच्या संरक्षक भिंतीलगत लांबच लांब रांग लागलेली पहावयास मिळाली़ तर यामध्ये महिलाही मोठ्या संख्येने होत्या़ आपल्या चिमुकल्यासह त्याही रांगेला लागल्या होत्या़ शाळेच्या प्रांगणात येताच महिलांना जणू त्यांचे शाळेचे दिवस आठवले असून विरंगुळ्यासाठी त्या ह्यचंपूलह्ण खेळत असल्याचे पहावयास मिळाले़ रांगेतच बसल्या-बसल्या कुटुंबातील इतर सदस्य त्यांना अल्पोपहार, पाणी पुरवित होते़ सकाळपासून लागलेली ही रांग सायंकाळपर्यंत वाढतच गेली़ काहींनी तर रात्रीच्या जेवणाचे डबेही सोबत आणले होते़ बालवाडीच्या २५० जागा गुजराती हायस्कुलमध्ये बालवाडीच्या २५० जागा आहेत़ बालवाडी प्रवेश घेतल्यानंतर या ठिकाणी पुढील वर्गात प्रवेश मिळतो़ बालवाडीत प्रवेशासासाठी वयाची मर्यादा ४ वर्ष असून ९ हजार रुपये शुल्क आकारण्यात येत असून प्रवेशप्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे राबविण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे सचिव प्रवीणभाई पटेल यांनी दिली़ पालकांचे शाळेपुढेच जागरण दिवसभर रांगेत लागल्यानंतर पालकांनी रात्रभर शाळेपुढेच जागरण केले़ त्यासाठी घरुनच अंथरुण-पांघरुण आणले होते़ रात्रीच्या वेळी महिलांना घरी पाठवून पुरुष मंडळींनी त्यांची जागा घेतली होती़ एकमेकांचा कुठलाच परिचय नसतानाही अनेकांनी घरुन आणलेले जेवणाचे डबे आनंदाने सोबतच्यांना दिले़ तर काहींनी इतरांना थांबवून जेवणासाठी घर गाठले़ मनसेने व्यवस्थापनावर नोंदविला आक्षेप दरम्यान, गुजराती हायस्कुलच्या समोर प्रवेशासाठी उन्हातान्हात पालक रांगेत लागले होते़ त्याबद्दल मनसेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारावार यांनी आक्षेप नोंदविला़ शाळा व्यवस्थापनाने त्या ठिकाणी पालकांना थांबण्यासाठी टेन्ट किंवा इतर व्यवस्था करायला हवी होती़ त्याचबरोबर पिण्यासाठी पाणी ठेवणेही गरजेचे होते़ परंतु तशी कोणतीही व्यवस्था येथे नव्हती़ शाळेच्या बाहेर फलक लावून काही घटना घडल्यास जबाबदारीही झटकली़ बंदोबस्त वाढविला़ पालकांनी रात्री शाळेच्या समोरच मुक्काम केल्याने या भागात वजिराबाद पोलिसांनी रात्री गस्त वाढविली होती़ रांगेत महिलाही असल्याने महिला पोलिस कर्मचार्‍यांनाही पाचारण केले होते़