शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

स्टेशनवर आंघोळ पडली महागात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2016 00:06 IST

औरंगाबाद : रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर तुम्ही चुकूनही पाण्याची नासाडी केली तर दंडात्मक कारवाई होणे निश्चित आहे. त्यातही जर चक्क आंघोळ केली तर त्यासाठी थेट पाचशे रुपये मोजावे लागतील.

औरंगाबाद : रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर तुम्ही चुकूनही पाण्याची नासाडी केली तर दंडात्मक कारवाई होणे निश्चित आहे. त्यातही जर चक्क आंघोळ केली तर त्यासाठी थेट पाचशे रुपये मोजावे लागतील. याचाच प्रत्यय पर्यटन आणि देवदर्शनासाठी आलेल्या ४० प्रवाशांना बुधवारी औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर आला.पर्यटन आणि देवदर्शनासाठी रेल्वेच्या विशेष बोगीने बुधवारी सकाळी ४० प्रवासी औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर दाखल झाले होते. रेल्वेस्टेशनवर येणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये पाणी भरण्यासाठी रेल्वे रुळाजवळ पाईपलाईन आहे. सकाळची वेळ असल्याने यातील प्रवाशांनी थेट प्लॅटफॉर्मवरच आंघोळ करणे सुरू केले. काही जणांनी प्लॅटफॉर्मवरच कपडे धुण्यास सुरुवात केली. पाहता पाहता प्लॅटफॉर्म सांडपाण्याने भरून गेला. प्रवाशांनी कपडे धुतल्यानंतर ते वाळविण्यासाठी प्लॅटफॉर्मवरच टाकले होते. त्यामुळे रेल्वेस्टेशनला धोबी घाटाचे स्वरूप आले होते. हा प्रकार स्टेशन व्यवस्थापक अशोक निकम, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक धर्मेंद्रकुमार यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांच्या कानी पडला. त्यांनी तात्काळ धाव घेतली. तीव्र पाणीटंचाई असताना अशा प्रकारे पाण्याची नासाडी केली जात असल्याबद्दल त्यांनी प्रवाशांना चांगलेच सुनावले. यावेळी रेल्वे प्लॅटफॉर्मवर आंघोळ करून पाण्याची नासाडी केल्याप्रकरणी प्रत्येकी ५०० याप्रमाणे ४० जणांकडून २० हजारांचा दंड वसूल करण्यात आला.रेल्वेला पैसे मोजून प्रवासासाठी निघालो होतो. त्यामुळे रेल्वेस्टेशनवर काहीही करता येते, असाच या प्रवाशांचा समज होता. दंडाची कल्पना असती तर हॉटेल, लॉजमध्ये गेलो असतो. तेथे कमी रक्कम लागली असती, असे काही प्रवाशांनी म्हटले.