कर्मचाऱ्यांनी निवेदनात नमूद केले की, पुरातत्त्व विभागामार्फत अजिंठा लेणी येथे सुमारे तीस वर्षांपासून काम करीत असून, कुठल्याही प्रकारच्या सरकारी सवलती मिळत नाहीत. सर्व सरकारी सोयीसुविधा मिळाव्यात तसेच नोकरीत कायम करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर तुमचे म्हणणे केंद्र सरकारकडे मांडून तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल, असे आश्वासन खा. जलील यांनी दिले. निवेदनावर जनार्दन लव्हाळे, देवीदास जगताप, रमेश फुकटे, फकिरा तडवी, भगवान वराडे, शेख रईस, शेख जाकेर, ज्ञानेश्वर सुरशे, प्रकाश सपकाळ, अनिल दामोदर, भीमराव नप्ते आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
खासदार जलील यांना निवेदन
By | Updated: November 28, 2020 04:08 IST