शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्श ग्रामीण रुग्णालयास राज्य शासनाचा पुरस्कार

By admin | Updated: July 11, 2017 17:41 IST

लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील स्पर्श ग्रामिण रुग्णालयाला स्वच्छ भारत अभियान अंतर्गत रुग्णालयासाठी अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा राज्यस्तरीय कायाकल्प द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला

ऑनलाईन लोकमत
 
नांदेड : लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील स्पर्श ग्रामिण रुग्णालयाला स्वच्छ भारत अभियान अंतर्गत रुग्णालयासाठी दिला जाणारा राज्यस्तरीय कायाकल्प द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला.
 
कायाकल्प या केंद्र शासनाच्या पुरस्कार योजनेमध्ये  ५०० गुणांचे  चार स्तरीय मूल्यमापन करण्यात येते. यात महाराष्ट्रातील सर्व आरोग्य संस्थानी यामध्ये सहभाग नोंदवला होता. यात ९५.५४ गुणांकन प्राप्त करून स्पर्श रुग्णालयाने  राज्य स्तरीय द्वितीय पुरस्कार प्राप्त केला. दहा लक्ष रुपये, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
यशवंतराव चव्हाण प्रतीष्ठाण, मंत्रालय मुंबई येथे राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत,अप्पर मुख्य सचिव  डॉ. विजय सतबीर सिंग,राष्ट्रीय आरोग्य आयुक्त प्रदीप व्यास,अभियान आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार सोमवारी (दि. १० ) प्रदान करण्यात आला. संस्थेच्या प्रमुख इशा मेहरा, जिल्हा शल्यचीकीस्तक डॉ.एकनाथ माले ,प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी,प्रकल्प प्रमुख संगीता दास व कर्मचारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे.
 
ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्यविषयक गरजा जाणून घेऊन सास्तूर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालय महाराष्ट्र शासनाने  १८ वर्ष पूर्वी आरोग्य विभागामार्फत सुरु केले. जवळपास चार जिल्ह्यामधून १९१ गावामधून रुग्णांचा ओघ सुरु असतो. सुसज्ज बाह्यरुग्ण विभाग, अंतररुग्ण विभाग, शस्त्रक्रीयागार, क्ष-किरण यंत्रणा, सुसज्ज प्रयोगशाळा , सोनोग्राफी, दंतचिकित्सक विभाग, एच.आय.व्ही. बाधितांसाठी सामाजिक देखभाल केंद्र, ए.आर.टी.केंद्र, काळजी व आधार केंद्र, विपुला माता व बालसंगोपन केंद्र, सुसज्ज प्रशिक्षण केंद्र 3 फिरत्या  वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून येथे नागरिकांना आरोग्य सेवा व आरोग्य शिक्षण देण्यात येते.