शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कसबे तडवळ्यात साकारणार अत्याधुनिक वाचनालय...

By admin | Updated: April 14, 2017 01:06 IST

कसबे तडवळे : उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथे २२ व २३ फेब्रुवारी १९४१ रोजी भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिली महार-मांग वतनदार परिषद झाली होती़

कसबे तडवळे : उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथे २२ व २३ फेब्रुवारी १९४१ रोजी भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिली महार-मांग वतनदार परिषद झाली होती़ परिषदेनिमित्त आलेले डॉ़ बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेत वास्तव्याला होते, त्या शाळेची व परिसरातील विकास कामे करण्यासाठी शासनाकडून जवळपास एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे़ या निधीतून सुसज्ज सार्वजनिक वाचनालयासह या परिसरातील विकास कामे होणार आहेत़कसबे तडवळे येथील या ऐतिहासिक परिषदेसाठी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर हे २२ फेब्रुवारी १०४१ रोजी सकाळी रेल्वेने कळंब रोड रेल्वे स्टेशनवर आले होते़ त्या रेल्वे स्टेशनवरून सजविलेल्या एका बैलगाडीतून त्यांचे गावात वाजत-गाजत मिरवणुकीने स्वागत करण्यात आले़ या मिरवणुकीत ५१ सजविलेल्या बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या़ दुसऱ्या दिवशी सकाळी आयोजित परिषदेला परिसरातील जवळपास ६३ गावातील नागरिक सहभागी झाले होते़ विशेषत: महिलांची संख्या लक्षणीय होती़ या परिषदेत डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘शिका-संघटित व्हा आणि संघर्ष करा’़ वतनदारीचा लोभ सोडा, असा मूलमंत्र दिला होता़ यातूनच प्रेरणा घेवून परिवर्तनाचे नवे युग सुरु झाले. या परिषदेसाठी ज्या शाळेत डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मुक्कामी थांबले त्या शाळेचा व परिसराचा ऐतिहासिक ठेवा म्हणून विकास करावा, अशी मागणी या भागातील नागरिकांमधून होत होती़ त्यामुळेच शासनाकडून या ऐतिहासिक वास्तूच्या विकास कामासाठी एक कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. यातून वाचनालय व इतर विकास कामे करण्यात येणार आहेत़