शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुकांकडून मोर्चेबांधणीस प्रारंभ

By admin | Updated: June 10, 2014 00:56 IST

संजय कुलकर्णी , जालना जालना विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे वारे वाहू लागले असून प्रमुख पक्षातील इच्छुक उमेदवारांची नावे चर्चिली जाऊ लागली आहेत. इच्छुक मोर्चेबांधणी करत आहेत.

संजय कुलकर्णी , जालनाजालना विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे वारे वाहू लागले असून प्रमुख पक्षातील इच्छुक उमेदवारांची नावे चर्चिली जाऊ लागली आहेत. इच्छुक उमेदवारही आप-आपल्यास्तरावर मोर्चेबांधणी करत आहेत. काँग्रेससमवेत राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी याही निवडणुकीत होणार किंवा नाही, याविषयीच्या चर्चेनेही जोर धरला आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी लाट चालली, मात्र या निवडणुकीत ती चालणार का? निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारामध्ये स्थानिक मुद्यांनाच महत्त्व राहणार का? असे विविध प्रश्न मतदारांच्याही मनात निर्माण झाले आहेत. विद्यमान काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी जायकवाडी - जालना पाणीपुरवठा योजनेचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यापासून त्यात लक्ष केंद्रित करून काम पूर्ण होईपर्यंत व जालनेकरांना गतवर्षी दुष्काळाच्या भयावह परिस्थितीत पिण्याचे पाणी मिळवून देण्यापर्यंत जे प्रयत्न केले, सत्तेत काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री असताना पाणीप्रश्नावरून सरकारविरुद्ध आंदोलन केले. त्यामुळे आपण पाणीप्रश्न कशा अडचणीच्या काळात सोडविला, हे गोरंट्याल मतदारांमध्ये ठासून सांगणार, हे निश्चित. याशिवाय शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून राबविलेल्या काही विकास कामांवरही ते भर देतील, असे चित्र आहे. हा विधानसभा मतदारसंघ पूर्वीपासूनच युतीच्या जागा वाटपात शिवसेनेच्या वाट्याला आहे. मात्र यावेळी उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याविषयी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्येच संभ्रम आहे. माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी गेल्यावेळी घनसावंगीतून तर जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी जालना येथून विधानसभा निवडणूक लढविली होती. दोघांचाही पराभव झाला. येत्या निवडणुकीत खोतकर व अंबेकर हे दोघेही इच्छुक आहेत. मात्र खोतकर हे पुन्हा घनसावंगीतून की, जालन्यातून लढणार हे ठरायचे आहे. आंदोलनाद्वारे तसेच प्रसिद्धीपत्रकांद्वारे अंबेकरांनी स्थानिक आमदारांच्या कार्याबद्दल टीका, आरोप करण्याची संधी सोडलेली नाही. तर खोतकरांनी आपला जनसंपर्क जालना व घनसावंगी मतदारसंघात कायम ठेवला. मात्र रावसाहेब दानवे यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर जालन्यात काढलेल्या मिरवणुकीद्वारे खोतकरांनी दाखविलेला उत्साह काही औरच सांगत होता. शिवसेनेकडून उमेदवार कोण असेल, हे येत्या काळात निश्चित होईलच. दुसरीकडे मनसेकडून निवडणूक लढण्यास जिल्हाप्रमुख रवि राऊत हे इच्छुक असून त्यासाठीची तयारीही त्यांनी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अब्दूल रशीद पहेलवान यांनीही मध्यंतरी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली होती. भारिप बहुजन महासंघाकडून सुधाकर निकाळजे हे इच्छुक असून त्यांनीही तयारी सुरू केली आहे.