शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील पथदिवे सुरू करा

By admin | Updated: September 2, 2014 01:50 IST

जालना : गणेशोत्सवानंतर सुरू होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीला ८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेपासून सुरूवात होणार आहे. मात्र या दरम्यान भाविकांना त्रास होऊ नये, म्हणून पालिकेने

जालना : गणेशोत्सवानंतर सुरू होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीला ८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेपासून सुरूवात होणार आहे. मात्र या दरम्यान भाविकांना त्रास होऊ नये, म्हणून पालिकेने विसर्जन मिरवणूक मार्गावर पथदिवे सुरू करून सर्वच खड्डे बुजवावे, असे आवाहन पोलिस प्रशासन, राजकीय पक्ष व गणेश महासंघाच्या संयुक्त बैठकीत करण्यात आले. १ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीसंदर्भात पोलिस अधीक्षक कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी सहायक पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, उपअधीक्षक आय.टी. वसावे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनंत कुलकर्णी, संतोष पाटील, शंकर विभुते, अजय जगताप, विद्याधर काळे यांच्यासह महासंघाचे अध्यक्ष प्रशांत वाढेकर, कार्याध्यक्षा आयेशाखान मुलानी, मानाच्या गणपतीचे अध्यक्ष राजेंद्रकुमार आबड, नगराध्यक्ष पार्वताबाई रत्नपारखे, इकबाल पाशा, नगरसेवक शेख माजेदखान, काँगे्रसचे शहराध्यक्ष अ. हाफीज, शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले, गणेश सुपारकर, नगरसेविका जयश्री कुलकर्णी, अशोक पवार, राहूल देशपांडे आदींची उपस्थिती होती. यंदाच्यावर्षी विसर्जन मिरवणूक १० तासांची राहणार असून दुपारी २ वाजता मिरवणूकीला सुरूवात होणार आहे. रात्री १२ वाजता ही मिरवणूक संपणार आहे. वेळेसंदर्भात प्रथमच नियोजन करण्यात आले आहे. यात सर्वांचा सहभाग राहणार आहे. महाप्रसाद व अन्नदान कार्यक्रमाचे नियोजनही यानुसारच करण्यात यावे, असे आवाहन केले आहे. नगर पालिकेने शहरातील मिरवणूक मार्गासह सर्वच पथदिवे सुरू करावेत. भक्तांना त्रास होऊ नये, यासाठी मिरवणूक मार्गावरील सर्वच खड्डे तात्काळ बुजवावे, असेही आवाहन पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. मिरवणूक कचेरी रोडवरून मोतीबागेपर्यंत जाणार असून परतणारी वाहने औरंगाबाद चौफुली मार्गावरून परत जातील. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होणार नाही, त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. या बैठकीत गणेश विसर्जन मिरवुणकी दरम्यान येणाऱ्या अडचणी तसेच करावाच्या उपाययोजनांबाबत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले. शंकांचे निसन केले. (प्रतिनिधी)जालना शहर काही महिन्यांपासून अंधारात असल्याने नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. नागरिकांमधूनही रोषही व्यक्त करण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने पथदिवे सुरु करणे अपेक्षित होते. आता विसर्जन मिरवणूकनिमित्ताने पथदिवे सुरु करण्याची मागणी शहरवासियांमधून जोर धरत आहे.