प्रवेश प्रक्रियेची दुसऱ्या फेरीला २९ मार्चपासून प्रारंभ झाला असून, ७ एप्रिलपर्यंत प्रवेश घेता येणार आहे.आरटीई प्रवेशासाठी १७२ शाळा पात्र आहेत. २१९४ जागांसाठी १४५१ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. ७६ शाळांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक अर्ज आल्याने सोडत पद्धतीने प्रवेश निश्चित केले होते. १४५१ पैकी १००१ मुलांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. ३२ मुलांचे प्रवेश कागदपत्रांच्या त्रुटीमुळे रद्द झाले असून, १९३ मुलांनी इतर शाळेत प्रवेश घेतले. उर्वरित २२५ विद्यार्थ्यांनी मात्र पात्र असूनही अद्याप प्रवेश घेतलेला नाही. उपलब्ध अर्जाच्या ६९ टक्के प्रवेश निश्चित झाल्यामुळे जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. लाभ घेण्याचे आवाहन आवाहन शिक्षणाधिकारी शशीकांत हिंगोणेकर यांनी केले. (प्रतिनिधी)
आरटीई प्रवेशाच्या दुसऱ्या टप्प्यास प्रारंभ
By admin | Updated: April 2, 2017 23:32 IST