शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रोत्सवाला घटस्थापनेने प्रारंभ

By admin | Updated: October 2, 2016 01:08 IST

परभणी : शनिवारी जिल्हाभरात घटस्थापनेने शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. दिवसभर पावसाची रिपरिप असल्याने सार्वजनिक दुर्गा महोत्सव पदाधिकाऱ्यांची धांदल उडाली.

परभणी : शनिवारी जिल्हाभरात घटस्थापनेने शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. दिवसभर पावसाची रिपरिप असल्याने सार्वजनिक दुर्गा महोत्सव पदाधिकाऱ्यांची धांदल उडाली. अनेक दुर्गा मंडळांनी सायंकाळी उशिरा दुर्गादेवींची प्रतिष्ठापणा केली.जिल्ह्यात शनिवारपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. परभणी शहरात सार्वजनिक दुर्गा मंडळांची स्थापना झाली असून मागील १५ दिवसांपासून नवरात्र उत्सवाची तयारी सुरु होती. शनिवारी सकाळपासूनच शहरात पाऊस होता. त्यामुळे दुर्गा देवीच्या सवाद्य मिरवणुका निघाल्या नाहीत. अनेक मंडळांनी पावसापासून बचाव व्हावा म्हणून दुर्गा देवींच्या मूर्ती मंडळ स्थळापर्यंत नेल्या. परभणी बाजारपेठेत पावसामुळे गर्दी कमी झाल्याचे दिसून आले. जिल्हाभरात नवरात्र उत्सवाची जोरदार तयारी सुरु आहे. ठिकठिकाणी धार्मिक, मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले असून सजीव देखावेही उभारण्यात येत आहेत. परभणी जिल्ह्यामध्ये ३१८ सार्वजनिक दुर्गा मंडळांची स्थापना झाली आहे. परभणी तालुक्यात सर्वाधिक २१७ दुर्गा मंडळांची नोंदणी झाली असून पालम तालुक्यात ७, पाथरी १०, पूर्णा २९, जिंतूर २५, गंगाखेड १५, सोनपेठ ६, मानवत ४ आणि सेलू तालुक्यामध्ये ५ दुर्गा मंडळांची नोंदणी सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी दुर्गा देवींची प्रतिष्ठापणा करण्यासाठी आणि वर्गणी जमा करण्यासाठी सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे रितसर नोंदणी करण्याचे आवाहन या कार्यालयाने केले आहे.