शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

फाईलींच्या वर्गीकरणास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 00:24 IST

राज्याच्या कृषी आयुक्तांनी फाईलींच्या वर्गीकरणासंदर्भात आदेश काढल्यानंतर शनिवारी सुटीच्या दिवशीही येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात अधिकारी- कर्मचारी दिवसभर वर्गीकरणाच्या कामात गुंतले असल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्याच्या कृषी आयुक्तांनी फाईलींच्या वर्गीकरणासंदर्भात आदेश काढल्यानंतर शनिवारी सुटीच्या दिवशीही येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात अधिकारी- कर्मचारी दिवसभर वर्गीकरणाच्या कामात गुंतले असल्याचे दिसून आले.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत ड वर्गीय कागदपत्रे, अभिलेखे आणि अनावश्यक कागदपत्रे मोठ्या प्रमाणात पडून आहेत. मागील अनेक दिवसांपासून या कागदपत्रांचे वर्गीकरण झाले नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे जुन्या फाईली, कागदपत्रे पडून असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे, महाराष्ट्र शासनाचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी याबाबत लक्ष घातले. परभणी येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात फाईल आणि टपालांचे वर्गीकरण होत नसल्याने अभिलेखे वेळेत उपलब्ध होत नाहीत. तसेच कार्यालय परिसरात अस्वच्छता पसरते, ही बाब त्यांनी एका पत्राद्वारे निदर्शनास आणून दिली. याच अनुषंगाने कार्यालयातील संपूर्ण कागदपत्रांचे अ, ब, क, ड असे वर्गीकरण करण्याचे निर्देश उपविभागीय कृषी अधिकाºयांना दिले होते. विशेष म्हणजे, ११ व १२ नोव्हेंबर रोजी शासकीय कार्यालयाला सुटी असते. हा सुटीचा दिवस फाईलींच्या वर्गीकरणासाठी वापरावा, असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले होते.कृषी आयुक्त एस.पी. सिंह यांच्या या निर्देशानुसार ११ नोव्हेंबर रोजी येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी सकाळपासूनच कार्यालयीन कामकाजासाठी उपस्थित झाले. दुपारी ४ वाजता या कार्यालयास भेट दिली असता कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी दस्ताऐवजाच्या वर्गीकरणात मग्न असल्याचे पहावयास मिळाले. मागील अनेक वर्षापासूनच कागदपत्र, फाईली काढून त्या फाईलींचे गठ्ठे बांधले जात होते.प्रत्येक फाईलींना नाव देऊन अ, ब, क, ड या चार वर्गात वर्गीकरण करण्याचे काम अधिकारी, कर्मचारी करीत होते. अनेक दिवसांपासून कागदपत्रांचे वर्गीकरण झाले नसल्याने मोठ्या प्रमाणात कागदपत्र, फाईली टेबलांवर पहावयास मिळाल्या.