शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समिती निष्क्रिय

By admin | Updated: February 19, 2016 00:02 IST

औरंगाबाद : स्थायी समितीच्या गुरुवारच्या बैठकीत एमआयएमच्या सदस्यांनी पालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेवर बोट ठेवून थेट सभापतींवरच शरसंधान साधले.

औरंगाबाद : स्थायी समितीच्या गुरुवारच्या बैठकीत एमआयएमच्या सदस्यांनी पालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेवर बोट ठेवून थेट सभापतींवरच शरसंधान साधले. नऊ महिन्यांच्या काळात बैठकीत एकही प्रश्न निकाली निघाला नाही. तुमच्या आदेशांचेही पालन होत नाही. मग आम्ही बैठकांना यायचे कशाला, असा सवाल या सदस्यांनी सभापतींना केला. एका सदस्याने सभापतीच अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. यामुळे बैठकीत चांगलीच खडाजंगी होऊन गोंधळ उडाला.सदस्यांच्या नाराजीनंतर शेवटी सभापती दिलीप थोरात यांनी आतापर्यंतच्या बैठकीत दिलेल्या आदेशांवर प्रशासनाने कोणती कारवाई केली याचा अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. बैठकीच्या सुरुवातीला नगरसेवक अब्दुल नाईकवाडी यांनी वॉर्डातील विकासकामांचा मुद्या उपस्थित केला़ त्यावर सभापती दिलीप थोरात यांनी कार्यकारी अभियंता अफसर सिद्दीकी आणि सिकंदर अली यांना खुलासा करण्यास सांगितले़ तेव्हा अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू असल्याचे उत्तर दिले.या खुलाशावर नाईकवाडी यांनी आक्रमक पवित्रा घेतला. वर्ष झाले आम्ही प्रश्न मांडत आहोत, पण ते निकाली निघत नाही. याआधीच्या बैठकीतही किती तरी वेळा सभापतींनी माझ्या वेगवेगळ्या प्रश्नांवर कारवाईचे आदेश दिले, पण त्यांचे आदेश प्रशासन गांभीर्याने घेत नाही. मग आम्ही बैठकीत प्रश्न मांडायचे की नाही? की विरोधकांचे प्रश्न सुटू नयेत म्हणून सभापती अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत? असे प्रश्न नाईकवाडी यांनी उपस्थित केले़ त्यावर सभापती थोरात यांनी विनाकारण आरोप करू नका, तुमचे म्हणणे मी नेहमीच ऐकून घेतो, त्याचा गैरफायदा घेऊ नका, असे सुनावले. या उत्तरानंतर नाईकवाडी यांनी सभापती साहेब, आजपर्यंत तुम्ही दिलेल्या एकाही आदेशाचे प्रशासनाने पालन केलेले नाही़ तुमच्या आदेशाचे पालन झाले नाही याचे माझ्याकडे पुरावे आहेत. यावरून स्थायी समितीच निष्क्रिय असल्याचा संदेश जात आहे, असा आरोप नाईकवाडी यांनी केला़ त्यामुळे दोघांमध्ये बराच वेळ खडाजंगी झाली.एमआयएमचे नगरसेवक विकास एडके, नगरसेविका समीना शेख, शिवसेनेचे गजानन मनगटे, मकरंद कुलकर्णी यांनीही नाईकवाडी यांना साथ दिली. गजानन बारवाल आणि नितीन चित्ते यांनीही स्थायीच्या आदेशांचे पालन होत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे कात्रीत सापडलेल्या सभापती थोरात यांनी प्रभारी आयुक्तांना आतापर्यंतच्या बैठकांमधील आदेशांवर कोणती कारवाई केली याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. सभागृहात शॉर्ट सर्किटबैठक सुरू असतानाच स्थायी समिती सभागृहात शॉर्ट सर्किट झाले. अचानक छताच्या आतून धूर बाहेर येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर लगेचच सभागृहातील सर्व विद्युत दिवे, पंखे बंद करण्यात आले. बैठकीवर मात्र त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. या प्रकारानंतरही बैठक सुरूच होती.