पाथरी: ग्रामीण भागातील जनतेचा महसूल विभाग कणा समजला जातो. मात्र महसूल विभागातील रिक्त पदांमुळे नागरिकांची कामे वेळेच्या आत होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. पाथरी तहसीलमध्ये कर्मचार्यांच्या रिक्तपदांनी तर उच्चांक गाठला होता. पाथरी येथे तीन नायब तहसीलदार व सहा पेशकार रुजू झाल्यामुळे महसूल विभागात कर्मचारी फुलफील झाले असून आता नागरिकांची कामे वेळेच्या आत मार्गी लागतील, अशी अपेक्षा आहे.पाथरी तहसील कार्यालय गेल्या काही महिन्यांपासून कर्मचार्यांच्या रिक्त पदांमुळे चांगलेच चर्चेत आले होते. या ठिकाणी मागील काही वर्षे कायमस्वरुपी तहसीलदारांची पदे भरण्यात आली नव्हती. कित्येक वर्षे नायब तहसीलदारांकडे पदभार सोपविण्यात आला होता. त्यानंतर येथील तहसीलदाराचे पद कायस्वरुपी भरण्यात आल्यानंतर कार्यालयातील इतर कर्मचार्यांच्या रिक्त जागेबाबत मात्र महसूल प्रशासनाकडून कधी गांभीर्याने घेतले गेले नाही. सहा पेशकार आणि दोन नायब तहसीलदारांची पदे गेल्या कित्येक महिन्यांपासून रिक्त होती. पर्यायाने तहसील कार्यालयातील अनेक कामे खोळंबून पडली होती. जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांनी येथील रिक्त कर्मचार्यांच्या बाबत तातडीने निर्णय घेत काही पेशकारांची रिक्त पदे आणि तीन नायब तहसीलदारांची पदे भरली आहेत. यामुळे कर्मचारी नाहीत, अशी ओरड करुन चालढकल करणार्या इतर कर्मचार्यांना आता जनतेची कामे करावी लागणार आहेत. महसूल विभागातील सर्वच कर्मचार्यांची पदे भरल्याने महसूल विभाग आता फुलफील झाला आहे. तर पदे भरल्याने नागरिकांना आता आपली कामे वेळेच्या आत पूर्ण होतील, अशी अपेक्षाही निर्माण होऊ लागली आहेत. (वार्ताहर)फाईल्स होत्या धूळखातसेतू सुविधा केंद्रामधून जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवासी आणि इतर कागदपत्रांसाठी नागरिक प्रस्ताव दाखल करीत असत. यासाठी पेशकाराची (अव्वल कारकून) स्वाक्षरी अनिवार्य असल्याने कार्यालयात पेशकार नसल्यामुळे अनेक वेळा फाईल्स धूळखात पडून राहत असत. पेशकार उपलब्ध नसल्याने तहसीलदारांचाही नाईलाज व्हायचा. मात्र आता नवीन पेशकारामुळे फाईल्स धूळखात पडून राहण्याची वेळ येणार नसल्याचे दिसते. एकाच अधिकार्याकडे अनेक पदभारमहसूल विभागात अनेक पदे रिक्त असल्यामुळे कार्यरत असणार्या एकाच अधिकार्यांकडे अनेक विभागांचा पदभार देण्यात आला होता. यामुळे अनेक वेळा गोंधळाची परिस्थिती निर्माण व्हायची आणि अतिरिक्त पदभार असल्यामुळे संबंधित अधिकारीही कामाचा बोजा अंगावर पडल्याने काम करण्यास टाळाटाळ करायचे. परंतु, आता कर्मचार्यांची पदे भरल्यामुळे अतिरिक्त पदभारही काढून घेण्यात आला आहे.
पाथरी महसूल विभागातील कर्मचार्यांच्या जागा भरल्या
By admin | Updated: June 6, 2014 01:02 IST