पालम : तालुक्यातील कांदलगाव येथे गावातील समस्या त्यांच्यासमोर सोडविण्याच्या उद्देशाने तालुका प्रशासनाचा ताफा २ जुलै रोजी रात्री मुक्कामी आला होता़ यावेळी ग्रामसभा घेऊन गावातील अडी अडचणीवर चर्चा करण्यात आली आहे़ प्रशासन व ग्रामस्थ यांच्यात सुसंवाद व्हावा व गावातील अडचणी लोकसहभागातून सुटाव्यात यासाठी शासनाने अधिकारी व कर्मचाऱ्यांना एक दिवस गावात मुक्कामी राहण्याचा आदेश दिला आहे़ यानुसार पालम तालुक्यातील सर्वच विभागातील अधिकारी कांदलगाव येथे मुक्कामास गेले होते़ उपविभागीय अधिकारी गोविंद रणवीरकर, तहसीलदार अनिल देशपांडे, नायब तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, विश्वनाथ अंभोरे, गटविकास अधिकारी मधुकर कदम, तालुका कृषी अधिकारी सुरेंद्र पवार, विस्तार अधिकारी धनराज यरमाळ यांच्यासह कर्मचाऱ्यांनी मुक्काम केला़ यावेळी कांदलगावात ग्रामसभा घेण्यात आली़ यावेळी शाळेला जागा मिळवून, नावलगाव ते कांदलगाव रस्त्याचे मजबुतीकरण करणे, केरवाडी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे या विषयी सविस्तर चर्चा झाली़ १५० शौचालयाच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली आहे़ यशस्वीतेसाठी सरपंच गणेश शिंदे, सुधीर देशपांडे, राजीव सोलापुरे, मारोती भंडरवाड, राजेश देशमुख, मधुकर बंडे यांनी परिश्रम घेतले़ (प्रतिनिधी)
कांदलगावात अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मुक्काम
By admin | Updated: July 4, 2014 00:11 IST