शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
3
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
4
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
5
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
6
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
7
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
8
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
9
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
10
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
11
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
12
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
13
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
14
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
15
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
16
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
17
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
18
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
19
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
20
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

चोरट्यांची पोलिसांवर दगडफेक

By admin | Updated: October 30, 2014 00:30 IST

अजिंठा- पेट्रोलिंगवरील दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर आठ ते दहा चोरट्यांनी दगडफेक करून त्यांना जखमी केल्याची घटना घडली.

अजिंठा- संशयितरीत्या आढळून आलेल्या विना क्रमांक टेम्पोची झडती घेण्यासाठी गेलेल्या पेट्रोलिंगवरील दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर आठ ते दहा चोरट्यांनी दगडफेक करून त्यांना जखमी केल्याची घटना वाघोरा फाटा ते शिवना रस्त्यावर मंगळवारी रात्री घडली. यात पोलिसांच्या जीपचेही नुकसान झाले आहे. या प्रकरणी अजिंठा पोलिसांत अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.कॉ अंकुश बागल, जीपचालक पो.कॉ. मिर्झा बेग अशी जखमी पोलिसांची नावे आहेत. त्यांच्या सोबत फौजदार अनंत जगताप होते. या हल्ल्यात त्यांना जखम झाली नाही. मंगळवारी रात्री पोलिसांची पेट्रोलिंग सुरू होती. यावेळी त्यांना वाघेरा फाटा ते शिवना रस्त्यावर एक टेम्पो (विना क्रमांक) संशयितरीत्या आढळून आला. तो टेम्पो अडवून तपासणीसाठी बागल व मिर्झा बेग हे पोलीस टेम्पोत चढत असताना आत ताडपत्री टाकून बसलेल्या ८ ते १० चोरट्यांनी पोलीस व त्यांच्या जीपवर आतूनच दगडफेक केली. चोरट्यांनी टेम्पोत आधीच दगड भरून ठेवले होते. यातील काही दगड पोलिसांना लागले तर काही पोलिसांच्या जीपवर लागल्याने जीपच्या काचा फुटल्या. दगड लागताच पोलिसांनी वाहनातून उडी मारली. त्यामुळे ते बालंबाल बचावले. ते सर्वजण चोरी करण्याच्या तयारीत होते. पोलिसांमुळे त्यांचा बेत फसणार होता. म्हणूनच त्यांनी पोलिसांवर हल्ला चढवला, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. फौजदार जगताप यांनी स्वत:कडील पिस्तूल चोरट्यांवर ताणली तेव्हा त्यांनी वाहनासह पोबारा केला. या घटनेची माहिती कळताच उपविभागीय अधिकारी राम मांडुरके, सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. एस. बिर्ला, ग्रामीण पोलीस ठाण्याचे मिलिंद खोपडे, सोयगाव पोलिसांनी व गुन्हे शाखा पोलिसांनी परिसरात रात्रभर गस्त घातली; पण त्यांना काहीच सुगावा लागला नाही. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. अजिंठा परिसरात गुन्हेगारी वाढली असल्याचे चित्र दिसत आहे. मागील आठवड्यात धोत्रा - शिवना रस्त्यावर एका दुचाकीस्वारास अडवून २५ लाख रुपये लुटले होते . त्या पाच आरोपींना पोलिसांनी १२ तासांच्या आत पकडले होते. आता पोलिसांवरच हल्ला झाला आहे. ते अज्ञात आरोपी कोण? पोलिसांवर हल्ला का केला याचा शोध अजिंठा पोलीस घेत आहेत.