शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षित मातृत्वाचा आनंदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:34 IST

एसटी महामंडळातील महिला कर्मचाºयांना हक्काच्या प्रसूती रजेबरोबरच ३ महिने अतिरिक्त पगारी रजा देण्याच्या निर्णयाचा आनंदोत्सव मंगळवारी साजरा करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एसटी महामंडळातील महिला कर्मचाºयांना हक्काच्या प्रसूती रजेबरोबरच ३ महिने अतिरिक्त पगारी रजा देण्याच्या निर्णयाचा आनंदोत्सव मंगळवारी साजरा करण्यात आला. स्त्रीचे मातृत्व कोणत्याही परिस्थितीत हिरावून घेतले जाणार नाही, या भावनेतून अखेर हा निर्णय घेण्यात आला. महामंडळातील महिला कर्मचाºयांनी एकमेकांना पेढे भरवत हा क्षण साजरा केला.एसटी महामंडळातील राज्यभरात काही महिला वाहकांचे अचानक गर्भपात झाल्याचा मन हेलावणारा प्रकार ‘लोकमत’ने १४ जुलै रोजी समोर आणला. याविषयी सर्वस्तरातून तीव्र पडसाद उमटले. अनेकांनी महामंडळाच्या कारभारावर टीकेची झोड उठवली. महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसह अन्य संघटनांनी या घटनेचा निषेध व्यक्त करीत महिला वाहकांना न्याय मिळवून द्यावा,अशी मागणी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली. यासंदर्भात विविध वृत्तांद्वारे ‘लोकमत’ने पाठपुरावा केला.‘लोकमत’ने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले. एसटी महामंडळातील हजारो महिला कर्मचाºयांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला. हक्काच्या प्रसूतीबरोबर ३ महिने अतिरिक्त पगारी रजा देण्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली. यामुळे एसटी महामंडळातील महिला कर्मचाºयांना यापुढे ९ महिने प्रसूती रजा मिळणार आहे.एसटीतील महिला कर्मचाºयांना नियमानुसार २६ आठवडे प्रसूती रजा दिली जात होती. ही रजा केव्हा घ्यायची हा त्या महिला कर्मचाºयाचा निर्णय असतो. बहुतांश महिला बाळाच्या जन्मानंतर संगोपनासाठी अधिक वेळ मिळावा, म्हणून उशिरा रजा घेण्यावर भर देतात. अशावेळी टेबलवर्क देण्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे नाईलाजाने कर्तव्यावर जाण्याची वेळ महिला वाहकांवर येत होती. यातूनच गर्भपाताच्या दुर्दैवी प्रकाराला सामोरे जाण्याची वेळ अनेक महिला वाहकांवर आली; या निर्णयामुळे अशी वेळ कोणावरही ओढवणार नाही, अशी आशा व्यक्त होत आहे. या निर्णयाचा लाभ सुमारे ४ हजार ५०० महिलांना मिळेल.