शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

रंगमंचावर ‘एसटी’ कर्मचा-यांचा ‘नाट्यसुगंध’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 23:49 IST

एसटी महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेतील कर्मचारी दैनंदिन बसबांधणीचे काम सांभाळून स्वत:मधील कलावंत जोपासत आहेत. कर्मचा-यांमध्ये दडलेला हा कलावंत नाट्य स्पर्धांच्या माध्यमातून समोर येत आहे. ‘नाट्यसुगंध’ असे नाव असलेला एसटी कर्मचाºयांचा संघ रंगमंचावर कलाविष्कार सादर करून वेगळा ठसा उमटवीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एसटी महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेतील कर्मचारी दैनंदिन बसबांधणीचे काम सांभाळून स्वत:मधील कलावंत जोपासत आहेत. कर्मचा-यांमध्ये दडलेला हा कलावंत नाट्य स्पर्धांच्या माध्यमातून समोर येत आहे. ‘नाट्यसुगंध’ असे नाव असलेला एसटी कर्मचाºयांचा संघ रंगमंचावर कलाविष्कार सादर करून वेगळा ठसा उमटवीत आहे.मध्यवर्ती कार्यशाळेतील कर्मचारी रमाकांत चाफेकानडे, राजू घाटे, लालू वाघमारे, मल्हारी वाघमारे, कुंदन मलभागे, गजानन मुळे, नारायण राचलवार, प्रवीण कांबळे, महेश वैद्य आणि डॉ. अलका कर्णिक हे सर्व जण नाट्य स्पर्धेत सहभागी होऊन एसटी महामंडळाच्या नावलौकिकात भर टाकत आहेत. नाटकामध्ये केवळ सहभागी न होता स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरण्यासाठी प्रत्येक जण परिश्रम घेतो. नाटकामध्ये ठसा उमटविण्यासाठी सरावाला तेवढेच महत्त्व आहे. बसबांधणीचे काम सांभाळून मिळणाºया वेळेमध्ये सर्व कर्मचारी नाटकाची तालीम करतात.गतवर्षी आंतरविभागीय नाट्य स्पर्धेत या कलावंत कर्मचाºयांनी ‘जमलं बुवा एकदाचं’ हे नाटक सादर केले होते. यामध्ये सर्वोत्कृष्ट कलावंत म्हणून कुंदन मलभागे यांनी पारितोषिक पटविले. इतर नाट्य स्पर्धांमध्येही कर्मचाºयांनी सहभागी होऊन एक वेगळी ओळख निर्माण केली. पुढील आठवड्यात नगर येथे राज्यस्तरीय स्पर्धा होत आहे. यामध्ये हे कलावंत ‘विक्रमादित्य’ हे नाटक सादर करणार आहेत. त्यासाठी मागील महिनाभरापासून कर्मचारी सराव करीत आहेत. कार्यशाळा व्यवस्थापक उद्धव काटे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाºयांची ही वाटचाल सुरू आहे. युवा कर्मचाºयांबरोबर ज्येष्ठ कर्मचारीही ‘नाट्यसुगंध’मध्ये तेवढ्याच उत्साहाने सहभागी झालेले आहेत. त्यामुळे नाटक अधिक चांगले होण्यासाठी त्यांचेही मार्गदर्शन मिळते.कर्मचाºयांचे आॅडिशननाटकामध्ये केवळ सहभाग नोंदवून, नाटक सादर करूनच थांबायचे नसते, तर त्यापुढे वाटचाल करायची असते. त्यामुळे मनापासून आवड असलेला खरा कलावंत नाटकात सहभागी झाला पाहिजे. त्यामुळे नाटकात आवश्यक असलेल्या पात्रांसाठी कर्मचाºयांचे आॅडिशन घेऊन निवड झाली.जीवनात ऊर्जाएकंदरीत कामगारांच्या जीवनात किती संघर्ष असतो, हे सगळ्यांना माहीत आहे. नाटकांमध्ये सहभागी होऊन जीवनामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. स्पर्धेत विजयी होऊन कार्यशाळेचे नाव उंचविण्यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे गजानन मुळे, कुंदन मलभागे, प्रवीण कांबळे यांनी सांगितले.