शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

श्री सिद्धेश्वर महाशिवरात्री यात्रेला उत्साहात प्रारंभ

By admin | Updated: February 25, 2017 00:32 IST

लातूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व श्री रत्नेश्वर देवस्थानच्या ६४ व्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवास गुरुवारी मध्यरात्रीपासून प्रारंभ झाला

लातूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व श्री रत्नेश्वर देवस्थानच्या ६४ व्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवास गुरुवारी मध्यरात्रीपासून प्रारंभ झाला. गवळी समाजाच्या दुग्धाभिषेकाने यात्रेस उत्साहात प्रारंभ झाला. उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे यांच्या हस्ते ‘श्रीं’ची महापूजा व ध्वजारोहण करण्यात आले. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर ग्रामदैवताचे दर्शन घेण्यासाठी भाविक भक्तांनी मध्यरात्रीपासून मंदिरात मोठी गर्दी केली होती. २४ फेब्रुवारी ते १२ मार्च असे एकूण १७ दिवस यात्रा महोत्सव चालणार आहे. २३ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजता तोफांची आतषबाजी व गवळी समाजाच्या महाभिषेकानंतर दर्शन सोहळ्यास प्रारंभ झाला. शुक्रवारी पहाटे ५ वाजेपर्यंत संत सावता माळी भजनी मंडळातर्फे पालखी मिरवणूक काढण्यात आली. श्री सिद्धेश्वर मंदिरात सकाळी ८ वाजता पुष्पाभिषेक व पुष्पवृष्टीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर सकाळी ९ वाजता उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे यांच्या हस्ते महापूजा व ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी यात्रा महोत्सव समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले. तहसीलदार संजय वारकड, महेश हिप्परगे, श्रावण उगिले, यात्रा महोत्सव समितीचे मार्गदर्शक विक्रम गोजमगुंडे, सचिव अशोक भोसले, सुरेंद्र पाठक, ज्ञानोबा कलमे, व्यंकटेश हालिंगे, सुरेश गोजमगुंडे, बच्चेसाहेब देशमुख, प्रदीप पाटील खंडापूरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी श्री सिद्धेश्वर व श्री रत्नेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून यात्रा महोत्सव समितीचे पदाधिकारी व स्वयंसेवक प्रयत्नशील आहेत. मागील दोन-तीन वर्षे दुष्काळ होता. आता वरुणराजाने केलेल्या कृपादृष्टीमुळे यात्रा महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. (प्रतिनिधी)