लातूर : घराचा कडीकोंडा तोडून घरातील सोन्याच्या दागिन्यांसह २ लाख ६३ हजार रुपये पळविल्याची घटना शहरातील जुना औसा रोडवरील लक्ष्मीधाम कॉलनी येथे घडली़ याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़शहरातील जूना औसा रोडवरील लक्ष्मीधाम कॉलनी येथे दयानंद पाटील यांचे घर आहे़ मंगळवारी दिवसभराच्या कालावधीत घरी कुणीही नसल्याने त्यांनी घरास कुलूप लावले होते़ दरम्यान, अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून तसेच अन्य एकाच्या घराच्या दाराचाही कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला़ घरातील लाकडी टेबलाच्या ड्रॉमधील व स्टीलच्या डब्यातील सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण २ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज पळविला़ याप्रकरणी पाटील यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. (प्रतिनिधी)
घर फोडून अडीच लाख पळविले
By admin | Updated: June 26, 2014 00:36 IST