औरंगाबाद : शहर आणि जिल्ह्यात पावसाला सुरुवात होत नाही, तोच साथरोगांचा फैलाव सुरू झाला आहे. डेंग्यूपाठोपाठ कॉलरा, गॅस्ट्रोसह जलजन्य विकारांनी डोके वर काढायला सुरुवात केली आहे. शहरातील विविध भागांत कॉलऱ्याचे तीन रुग्ण सापडले. एकट्या घाटी रुग्णालयात महिनाभरात गॅस्ट्रोच्या १८८ रुग्णांनी उपचार घेतले. महापालिका आणि आरोग्य यंत्रणेने वेळीच उपाययोजना केली नाही, तर साथ पसरण्याचा धोका आहे.शहरातील विविध भागांत उघड्या नाल्या, साचलेली डबकी, जागोजागी पडलेले कचऱ्याचे ढीग, स्वच्छतेकडे दुर्लक्ष यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. स्वच्छतेकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे डासांची उत्पत्ती होण्यास हातभार लागत आहे. खुद्द महापालिकेनेच साथीच्या आजारांसाठी २१८ वसाहती अतिजोखमीच्या असल्याचे जाहीर केले. अशा परिस्थितीमुळे साथीच्या विकारांनी डोके वर काढले आहे.
शहरात साथरोगांचा फैलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2016 23:57 IST