बीड: गेवराई तालुक्यातील शिरसमार्ग येथे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर फवारणीसह अॅबिटिंग कार्यक्रम करण्यात करण्यात आला. यावेळी डॉक्टरसह आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी साथरोग टाळण्यासाठी ग्रामस्थांना घरोघरी जाऊन मार्गदर्शनही केले. पावसाळ्यात गावा-गावात घाण पाण्याचे डबके साचून यावर डासांची संख्याही वाढते. याच कालावधीत डेंड्यू, मलेरिया आदींसह साथ आजारही मोठ्या प्रमाणावर फैलावतात. असे साथीचे आजार अनेकदा दुषित पाणी पिण्यात आल्यामुळेही वाढतात. असे आजार शिरसमार्ग गावामध्ये फैलावू नयेत, यासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. अजित लड्डा यांच्यासह कर्मचाऱ्यांनी गावातील घरो-घरीजाऊन ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. साथीचे आजार फैलावू नयेत, यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना केल्या. तसेच साथीचे आजार कशामुळे फैलावतात, याची माहितीही दिली. तसेच ‘कोरडा दिवस’ पाळण्यासाठी आवाहनही केले. यावेळी फवारणीसह पाणी साठवण केल्या जाणाऱ्या रांजण, हौद, बॅरल आदींमध्येही अॅबिटिंग टाकण्यात आले. ग्रामस्थांच्या घरातील पाण्यासह गावातील मोकळ्या जागेवर असलेल्या डबक्यांमध्येही अॅबिटिंग टाकण्यात आले. यावेळी चौका-चौकातही ग्रामस्थांनाही साथीचे आजार टाळण्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन केले. गावामध्ये साथरोग फैलावतील यासाठी दक्ष राहण्याच्या सूचनाही यावेळी डॉ. अजित लड्डा यांनी केल्या. यावेळी आरोग्य विभागाचे कर्मचारी टी. ए. बेग, भोपळे, उघडे, सांगळे, गचांडे, वखरे, परदेशी, शेख आदींची उपस्थिती होती. यावेळी ‘कंटेंन्ट’ सर्वेक्षणही करण्यात आले.(प्रतिनिधी)
साथरोग निवारण्यासाठी फवारणी
By admin | Updated: August 10, 2014 02:03 IST