शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा संकुलाचं रुपडं ‘बिघडलं’

By admin | Updated: June 5, 2017 00:23 IST

बीड : शहरात एकमेव क्रीडा संकुल असल्याने खेळाडू येथे शहरासह जिल्ह्यातून खेळण्यासाठी येतात.

सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरात एकमेव क्रीडा संकुल असल्याने खेळाडू येथे शहरासह जिल्ह्यातून खेळण्यासाठी येतात. यातच मागील काही वर्षांपासून खेळांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे खेळाडूही वाढले आहेत. या खेळांचा सराव करण्यासाठी सकाळी व सायंकाळी क्रीडा संकुलात गर्दी होत असते. गर्दीच्या दृष्टीने हे संकुलातील जागा अपुरी पडते. जशी जागा मिळेल त्याठिकाणी नाईलाजास्तव खेळाडूंना सराव करावा लागतो. वारंवार जागेची मागणी करूनही याकडे क्रीडा कार्यालयाने दुर्लक्ष केल्याने आता खेळाडूही मागणी करून थकले होते.खेळातील तज्ज्ञ आणि जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीने उपलब्ध जागेतच खेळाडूंना कशाप्रकारे चांगल्या सुविधा देता येतील या दृष्टीकोणातून विचार केला. त्याप्रमाणे एक प्रस्ताव दाखल केला. त्याला जिल्हा प्रशासनाकडून मंजूरीही मिळाली. मैदानावर लॉन तयार करणे, लॉनला पाणी देण्यासाठी स्प्लींकनरची व्यवस्था, वॉकिंग करणाऱ्यांसाठी ट्रॅक, संकुलात पार्किंगची व्यवस्था, अंतर्गत रस्ते बनविणे, जाळी बसविणे अशा अनेक कामांचा समावेश होता. ही कामे करण्यास प्रत्यक्षात सुरूवातही झाली होती. तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा आडसूळ यांनी हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाला करण्यासाठी दिल्याचे सांगितले होते. तसेच आपण या कामावर नजर ठेवत असल्याचे सांगितले होते. परंतु त्यांच्या कार्यकाळात क्रीडा संकुलाचे काम झाले हे खरे असले तरी किती निकृष्ट दर्जाचे झाले, हे क्रीडा संकुलातील परिस्थिती पाहिल्यावरच लक्षात येते. अधिवेशनात लक्षवेधीविधान परिषद सदस्य आ. अमरसिंह पंडित यांनी दोन वर्षांपूर्वी क्रीडा कार्यालयातील गैरकारभार आणि भ्रष्टाचाराच्या प्रश्नासंदर्भात अधिवेशनात आवाज उठविला होता. याचीच दखल घेत तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा आडसूळ यांची चौकशी लागली होती. यावेळीही अधिवेशनात संकुलाचा मुद्दा लावून धरण्याची मागणी होत आहे.