बीड : जिल्ह्यातील युवकांनी समाज हितार्थ केलेल्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासासाठी कार्य करण्यासाठी क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना प्रोत्साहन मिळावे यासाठी क्रीडा कार्यालयाच्या वतीने विविध पुरस्कार दिले जातात, मात्र यावर्षी तीन पुरस्कारांची ३० हजार रूपये रक्कम परत गेली आहे.राज्याचे क्रीडा व युवा धोरण २०१२ शासन निर्णयान्वये क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा संघटक, युवा (महिला, पुरूष), गुणवंत खेळाडू (महिला, पुरूष) यांच्यासह एका नोंदणीकृत संस्थेला पुरस्कार देण्यात येत असतात. यासाठी क्रीडा कार्यालयाच्यावतीने सर्वच पुरस्कारांसाठी प्रस्तावही मागवविले होते. मात्र आजही खेळाकडे अनेकांची उदासीनता असल्याचे दिसून येते. क्रीडा कार्यालयाने माध्यमांद्वारे प्रसिद्धी देवून तर आवाहन केलेच होते शिवाय अनेकांना पत्र पाठवूनही या पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविले होते. मात्र या पुरस्कारांसाठी प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून येते.या पुरस्कारांची रक्कम शासनखातीक्रीडा संघटक, क्रीडा मार्गदर्शक व युवती पुरस्कार परत गेले असून याची रक्कम ३० हजार रूपये आहे. जशी रक्कम आली तशीच ती परत गेली. पुरस्काराचे इतर साहित्यही संचालकांकडे परत गेल्याचे जिल्हाक्रीडाधिकारी निलीमा आडसूळ यांनी सांगितले.मार्गदर्शक, युवतीसाठी प्रस्तावच नाहीयुवक पुरस्कार हा तत्वशील कांबळे यांना देण्यात आला तर युवतीसाठी प्रस्तावच आला नाही. तर क्रीडा संघटकासाठीही प्रस्ताव आला नव्हता. तर क्रीडा मार्गदर्शकासाठी दोन प्रस्ताव आले होते. मात्र हे दोन्ही प्रस्ताव निवड समितीने अपात्र ठरविले. त्यामुळे या तिन्ही पुरस्काराची रक्कम संचालकांकडे परत गेली असल्याचेही आडसुळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
क्रीडा पुरस्काराचा निधी गेला परत !
By admin | Updated: May 11, 2015 00:34 IST