एम. ए. फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित या शिबिराचे उद्घाटन फाउंडेशनचे अध्यक्ष शेख नावेद यांच्या हस्ते फीत कापून झाले. शिबिरात
तरुणाई रक्तदान करण्यात आघाडीवर होती. अनेकांची शिबिरात रक्तदान करण्याची पहिलीच वेळ होती. शिबिराच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशनचे उपाध्यक्ष जुबेर खान, मिर्झा शमीम बेग, अस्लम धांडे, शेख मुस्ताक, शेख जहीर, मिर्झा मुसेब बेग, शेख माजीद, सय्यद अस्लम, मतीन काझी, मिर्झा अदील बेग, शेख मजहर, शेख इलियास, शेख इरफान, शेख अजीम, अस्लम पठाण, आदींनी प्रयत्न केले. विभागीय रक्तपेढीचे प्रमुख डाॅ. सुरेश गवई, काँग्रेस अपंग सेलचे शहर अध्यक्ष अब्दुल मुज्जसर उपस्थित होते.
लाखमोलांचे प्राण वाचविण्यासाठी पाऊल
कोरोना काळात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा दूर करताना नागरिकांचे लाखमोलाचे प्राण वाचविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले. आपल्या एका रक्तदानामुळे कोणाला तरी नवीन आयुष्य मिळेल, जीवदान मिळेल, अशीच प्रत्येक रक्तदात्याची भावना होती.
-----
फोटो ओळ...
सिल्कमिल काॅलनीत आयोजित शिबिरातील रक्तदात्यास प्रमाणपत्र देताना एम. ए. फाउंडेशनचे अध्यक्ष शेख नावेद. यावेळी उपस्थित रक्तदाते.