शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात

By admin | Updated: October 12, 2016 00:06 IST

लातूर : लातूर शहर व परिसरात ६० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

लातूर : लातूर शहर व परिसरात ६० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आंबेडकर पार्क येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बुद्ध वंदना घेण्यात आली. सायंकाळी परिवर्तन युवा संघटनेच्या वतीने जय भीम चौकातून आंबेडकर पार्कपर्यंत महाधम्म रॅली काढण्यात आली. आंबेडकर पार्क येथे झालेल्या ध्वजारोहण सोहळ्याला सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांसह समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. नगरसेवक चंद्रकांत चिकटे, पृथ्वीराज सिरसाट, डॉ. शिवाजी जवळगेकर, लक्ष्मण खंडागळे, बसवंतअप्पा उबाळे, आर.ई. सोनकांबळे, कॉम्रेड विश्वंभर भोसले, प्रा. व्यंकट कीर्तने, अ‍ॅड. संजय सितापुरे, अ‍ॅड. बाबासाहेब गायकवाड, केशव उर्फ बाळासाहेब कांबळे, प्रा. अनंत लांडगे, संजय सोनकांबळे, संतोष सूर्यवंशी, प्रा. युवराज धसवाडीकर आदींची उपस्थिती होती. शहरातील बुद्ध गार्डन, प्रकाश नगर, विक्रम नगर, बौद्ध नगर, सुभेदार रामजी नगर, गौतम नगर, आनंद नगर येथील विहारात धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा झाला. त्रिशरण पंचशील समाज बांधवांनी ग्रहण केले. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे किशोर जाधव यांच्या भीम-बुद्ध गीतांचा कार्यक्रम झाला. सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने झालेल्या या कार्यक्रमाला शहरातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. (प्रतिनिधी)