औरंगाबाद : सखींनो... चला... झटपट तयारीला लागा.... कारण आता वेळ आली आहे, तुमच्या आवडत्या सिनेतारकांसोबत ‘गप्पा-टप्पा’ मारण्याची. मराठी चित्रपटसृष्टीतील हसरी, अवखळ आणि गुणवंत अभिनेत्री स्पृहा जोशी आणि हजारो तरुणींना वेड लावणारा हॅण्डसम अभिनेता सिद्धार्थ चांदेकर खास तुमच्या भेटीला येणार आहेत. स्पृहा आणि सिद्धार्थ या आपल्या आवडत्या कलाकारांची भेट सखी मंच सदस्यांसाठी जणू पर्वणीच ठरणार आहे.या दोघांना प्रत्यक्ष बघण्याची, भेटण्याची आणि त्यांच्याशी ‘गप्पा टप्पा’ मारून त्यांना अनुभवण्याची संधी या निमित्ताने तमाम सखींना मिळणार आहे. ज्याच्याशी मनमुराद बोलावे वाटेल, ज्याला काही तरी सांगावे वाटेल, अशा दोन व्यक्तींच्या नात्यांची गोष्ट सांगणारा मराठी चित्रपट ‘लॉस्ट अॅण्ड फाऊंड’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. स्पृहा आणि सिद्धार्थ यांच्या अभिनयाने नटलेल्या ‘लॉस्ट अॅण्ड फाऊंड’ या चित्रपटाची संपूर्ण टीम या कार्यक्रमात येणार आहे. मंगळवार, १९ जुलै रोजी सायं. ५ वा. लोकमत हॉल, लोकमत भवन, जालना रोड येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला येताना सखी मंच सदस्यांनी त्यांचे ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. प्रवेश मागील गेटने देण्यात येईल.
स्पृहा आणि सिद्धार्थ येणार सखींच्या भेटीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2016 01:12 IST