शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वपित्री संपताच उमेदवारीला उधाण

By admin | Updated: September 25, 2014 00:59 IST

औरंगाबाद : पितृपक्षातील सर्वपित्री अमावास्या संपताच विधानसभा निवडणूक अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.

औरंगाबाद : पितृपक्षातील सर्वपित्री अमावास्या संपताच विधानसभा निवडणूक अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. शिवसेना- भाजपाची युती झाली असली तरी उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विद्यमान आमदारांना उद्या २५ रोजी घटस्थापनेच्या मुहूर्तावर अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. सकाळी ९ वाजेपासून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काढण्यात येणाऱ्या सवाद्य मिरवणुकीतून उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन शहरातील तिन्ही मतदारसंघांमध्ये पाहावयास मिळेल. इतर उमेदवारदेखील उद्याच अर्ज दाखल करणार आहेत. आज दिवसभर प्रत्येकाची मिरवणुका काढून अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू होती. शिवसेनेकडून आ. प्रदीप जैस्वाल, एमआयएमकडून इम्तियाज जलील, पूनमचंद बमणे हे मध्य मतदारसंघातून तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे आ. संजय शिरसाट, एमआयएमकडून गंगाधर गाडे हे अर्ज भरणार आहेत. भाकपचे डॉ. भालचंद्र कांगो हे पूर्व मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत.काही उमेदवारांनी सिनेअभिनेते, अभिनेत्रींना मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी बोलावले आहे. यामध्ये मराठी-हिंदीतील कलाकारांचा समावेश आहे.