नांदेड: नांदेड-पुणे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता विशेष आठ गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली़ नांदेड येथून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे़ ्द्विसाप्ताहीक गाडीच्या एकुण आठ फेऱ्या करण्यात येणार आहे़ गाडी क्रमांक ०७६२२-०७६२१ नांदेड येथून ७, ९, १४, १६, २१, २३, २८ व ३० जुलै रोजी पुण्यासाठी रात्री ९ वाजता सुटेल़ दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता पुणे स्टेशनवर पोहोचेल़ ही गाडी परभणी, परळी, लातूर मार्गे जाईल़ परतीच्या प्रवासात ही गाडी पुणे येथून ८, १०, १५, १७, २२, २४, २९ व ३१ जुलै रोजी रात्री ७़५५ मिनिटांनी सुटून नांदेड स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता पोहोचेल़ विशेष रेल्वे गाडीस एकुण ११ डब्बे राहणार असून यात एक ए़सी़ टू टीयर, एक ए़सी़ थ्री टीयर, चार द्वितीय श्रेणी, तीन जनरल व दोन एसएलआरचे डब्बे आहेत़ प्रवाशांनी या गाडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे़ दरम्यान, रेल्वेच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे़ (प्रतिनिधी)
नांदेड-पुणे द्विसाप्ताहीक विशेष आठ गाड्या
By admin | Updated: July 3, 2014 00:23 IST