शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

विशेष दुरुस्तीचे १७ प्रस्ताव मंजूर

By admin | Updated: March 15, 2016 01:00 IST

हिंगोली : जिल्ह्यात आता टंचाईच्या झळा तीव्रतेने जाणवू लागल्यानंतर वाढलेली ओरड लक्षात घेता प्रशासनही कामाला लागले आहे.

हिंगोली : जिल्ह्यात आता टंचाईच्या झळा तीव्रतेने जाणवू लागल्यानंतर वाढलेली ओरड लक्षात घेता प्रशासनही कामाला लागले आहे. त्यामुळे टंचाईतील विशेष दुरुस्तीचे जवळपास ४0 लाख रुपये किमतीचे १७ विशेष दुरुस्तीचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केले आहेत.हिंगोली जिल्ह्यातील जवळपास २३ गावांतील पूरक योजना व दुरुस्तीचे प्रस्ताव टंचाईमध्ये जिल्हा कचेरीत दाखल करण्यात आले होते. यापूर्वीही प्रस्ताव आलेले असताना ते त्रुटीत निघाल्याने परत पाठविले होते. यंदा प्रथमच जिल्हा परिषदेने पाणीपुरवठा विभागाला मिळालेल्या देखभाल व दुरुस्तीत काही गावांचे प्रस्ताव मार्गी लावले. त्यामुळे मध्यंतरी होणारी ओरड थांबली होती. तरीही टंचाईमुळे अनेक गावांतील दुरुस्ती व इतर कामे निघतच आहेत. त्यात एकूण २३ प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने जिल्हा कचेरीकडे दाखल केले होते. त्यापैकी १७ प्रस्तावांना मंजुरी दिली. यातीलही दोन प्रस्तावात सुधारित अंदाजपत्रके सादर करण्यास सांगण्यात आले आहे. यामध्ये मंजूर झालेल्या प्रस्तावांत कळमनुरी तालुक्यातील अप्पादेववाडी, चिखली नवीन, खरवडा, जटाळवाडी, चुंचा या गावांचा समावेश आहे. तर औंढ्यातील पेरजाबाद नालेगाव, हिंगोली तालुक्यातील पारडा, धानोरा बं., सेनगाव तालुक्यातील माळसापूर खुटाडी, वाघजाळी, सोनसावंगी, पिंपरी बर्डा, ब्रह्मवाडी, वाढोणा या गावांचा समावेश आहे. हिंगोली तालुक्यातील लोहरा व अन्य एका गावाचा सुधारित प्रस्ताव देण्यास सांगण्यात आले आहे.पालकमंत्री दिलीप कांबळे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्यापूर्वी ४0 लाखांच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. मात्र अनेक ठिकाणच्या लोकांना अधिग्रहणाची रक्कम मिळाली नसल्याची ओरड आहे. काहींची तर गतवर्षीची रक्कम अजूनही मिळालेली नाही. त्यामुळे यंदा अनेकांनी विहीर, बोअर अधिग्रहण करताना वाद घालण्याचे प्रकारही केले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)