शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
2
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
3
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
4
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
5
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
6
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
7
तुमच्या कराचा पैसा जातोय कुठे? GST मध्ये १५ हजार कोटींचा महाघोटाळा, वाचा काय आहे हे प्रकरण!
8
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
9
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
10
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
11
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
12
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
13
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
14
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
15
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
16
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
17
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
18
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
19
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
20
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 

भाजपा आमदारांच्या दिमतीला विशेष विमान

By admin | Updated: October 21, 2014 01:09 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातून निवडून आलेले भाजपाचे ११ आमदार सोमवारी दुपारी विशेष विमानाने मुंबईला रवाना झाले. पक्षाने केलेली ही व्यवस्था पाहून आमदारही हरखून गेले.

औरंगाबाद : मराठवाड्यातून निवडून आलेले भाजपाचे ११ आमदार सोमवारी दुपारी विशेष विमानाने मुंबईला रवाना झाले. पक्षाने केलेली ही व्यवस्था पाहून आमदारही हरखून गेले. राज्यात सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आलेल्या भाजपाने यावेळी मराठवाड्यात नेत्रदीपक यश मिळविले आहे. गतविधानसभा निवडणुकीत केवळ दोन आमदार असलेला भाजपा यंदा खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करीत मराठवाड्यातही १५ आमदार निवडून आल्याने सर्वांत मोठा पक्ष बनला आहे. पक्षाच्या नेत्यांचे मुंबईत बैठकांचे सत्र चालूच असून पक्षाची पुढील दिशा ठरविली जात आहे. यामुळे पक्षाने नवनिर्वाचित सर्व आमदारांना मुंबईत पाचारण केले आहे. यातील काही आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.यामुळे सोमवारी दुपारी पक्षाचे ११ आमदार विशेष विमानाने रवाना झाले. पक्षाचे राज्य उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे (फुलंब्री), अतुल सावे (औरंगाबाद पूर्व), भीमराव धोंडे (आष्टी), नारायण कुचे (बदनापूर), बबनराव लोणीकर (परतूर), गोविंद राठोड (मुखेड), तानाजी मुटकुळे (हिंगोली), लक्ष्मण पवार (गेवराई), आर. टी. देशमुख (माजलगाव), संगीता ठोंबरे (केज) रवाना झाले. या आमदारांना सोडण्यासाठी भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, नगरसेवक अनिल मकरिये, तसेच पक्षाचे कार्यकर्ते विमानतळावर उपस्थित होते. सोमवारी सकाळीच हे आमदार रवाना होणार होते. मात्र, विमान उशिरा आल्याने हे आमदार दुपारी रवाना झाले. पंकजा पालवे, प्रशांत बंब आणि इतर आमदार हेही मुंबईला गेले असल्याची माहिती मिळाली. औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे तीन आमदारही मुंबईकडे शिवसेना पक्षप्रमुखांना भेटण्यासाठी रवाना झाल्याचे कळते. राज्यात सत्ता स्थापण्याच्या हालचाली चालू असून शिवसेना सत्तेत सहभागी होणार असल्यास औरंगाबाद जिल्ह्यातून कुणाची तरी वर्णी लागू शकते, यासाठीही काही आमदार तयारीत असल्याचे बोलले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाची निवड सोमवारी होती, त्यासाठी पक्षाचे जिल्ह्यातील एकमेव आमदार आधीच मुंबईकडे गेल्याची माहिती मिळाली.